छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथे महानगरपालिका निवडणुकांपूर्वी पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल भाजपच्या 22 कार्यकर्त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले आहे. भाजप या ठिकाणी महानगरपालिकेत ९३ जागांवर निवडणूक लढवत आहे. येथील काही कार्यकर्ते उमेदवारी जाहीर झाल्यामुळे नाराज होते. पक्षाने एक बैठक घेऊन २२ कार्यकर्त्यांचे सदस्यत्व निलंबित करण्याचा निर्णय घेतला असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. या कार्यकर्त्यांना रविवारी पक्षातून काढून टाकण्यात आले. हकालपट्टी केलेल्या कार्यकर्त्यांपैकी ११ जणांनी शिवसेनेत प्रवेश केला असून, त्यांना यानिवडणुकीत उमेदवारी मिळाली आहे. तसेच, सात जण अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत आणि चार जण राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणार आहेत.