Kangana Ranaut : मविआच्या पराभवावर अभिनेत्री कंगना राणौत यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत 288 पैकी तब्बल 235 जागा जिंकून महायुतीने जोरदार मुसंडी मारली आहे. यात एकट्या भाजपने तब्बल 132 जागांवर विजय मिळवला आहे. तर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या पक्षांनीही दमदार कामगिरी केली. या सगळ्या घडामोडींवर आता बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाल्या कंगना राणौत ?
“”आमच्या पक्षासाठी हा एक ऐतिहासिक विजय आहे. साहजिकच आम्ही सर्वजण खूप उत्साहित आहोत. या निकालासाठी आम्ही महाराष्ट्राच्या आणि संपूर्ण भारताच्या जनतेचे आभार मानतो,” असे त्यांनी महायुतीचे कौतुक केले तर महाराष्ट्रात दैत्यांचा पराभव झाला, अशी टीका कंगना यांनी महाविकास आघाडीवर केली.
उद्धव ठाकरेंचा पराभव असा होईल याची अपेक्षा होती का?, असा प्रश्न कंगना यांना विचारण्यात आला होता. त्यावर त्या म्हणाल्या, “होय, मला ही अपेक्षा होती. तसेच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार असे विचारले असता पक्षातील वरिष्ठ नेते याबाबतचा निर्णय घेतील असे वक्तव्य कंगना यांनी केले आहे.





