नवी दिल्ली – हाथरस, भदोही येथे नुकत्याच घडलेल्या बलात्काराच्या घटनांनी उत्तर प्रदेश हादरले आहे हे खरे; किंबहुना पूर्ण देशच हादरला आहे. यातच माध्यमांना राजकीय नेत्यांना हाथरस घटनेतील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट न घेऊ दिल्यामुळे देशासह राज्यात तीव्र पडसाद उमटत होते यामुळे उत्तरप्रदेशातील भाजप सरकारवर जोरदार टीका देशभरातून करण्यात येत असतानाच सुरेंद्र सिंह हे उत्तर प्रदेशमधील बलिया विधानसभा मतदसंघातील आमदार असून त्यांनी हाथरस प्रकरणावर त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता आमदार सुरेंद्र सिंह यांनी चांगलीच मुक्तफळं उधळली.
Surendra Singh, BJP MLA from Ballia says rapes can stop if parents give their daughters good values. I think a better solution would be for parents to teach their daughters to KICK BJP THE HELL OUT! What misogynist, sick degenerates! #Hathras
pic.twitter.com/GxnSWIc2ob— Sania Ahmad (@SaniaAhmad1111) October 3, 2020
भाजपाचे बलियाचे आमदार सुरेंद्र सिंह म्हणाले की,’आपल्या मुलींवर चांगले संस्कार घडवा. फक्त कायदा आणि शिक्षा बलात्कारासारख्या घटना रोखू शकत नाहीत. तर मुलींचे चांगले संस्कार बलात्कार रोखू शकतात.
ते पुढे म्हणाले,’मुलींवर चांगले संस्कार घडवणं त्यांना शालीन राहण्यास शिकवणं हे आई वडिलांचं कर्तव्य आहे” असं भाजपाचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी म्हटलंय. त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हं आहेत.
दरम्यान,या महिलेला बेदम मारहाण करून तिच्यावर 14 सप्टेंबरला सामूहिक बलात्कार करण्यात आला. तिला गंभीर जखमी अवस्थेत सोडून देण्यात आले. सफदरजंग रुग्णालयात त्यांचा मंगळवारी मृत्यू झाला. त्याच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. घरात एकदा तरी मृतदेह नेऊ द्या, या त्यांच्या मागणीकडे पोलिसांनी कानाडोळा केल्याचा आरोप कुटुंबीयांकडून केला जात आहे.