भाजप मंत्र्यांचं मोठं विधान,”राष्ट्रवादी सोबत येत असेल तर त्यात अडचण काय ?”

मुंबई – महाराष्ट्रातील राजकीय संकट जसजसे गडद होत चालले आहे. महाविकास आघाडीचे सरकार जाऊन आता तब्बल दहा महिने पूर्ण होताहेत. सत्ता संघर्षाने राजकीय वातावरण चांगले तापले आहे. अशात भाजप राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अदानी प्रकरणात केलेल्या विधानावरून इतर पक्षातील नेत्यांकडून भाजपची बी टीम असल्याचीही टीका करण्यात आली आहे. शरद पवार यांच्या भूमिकेची राज्यात भलतीच चर्चा सुरू झाली आहे.
अशात भाजपा नेते आणि राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या विधान सध्या चर्चेत आले आहे. ‘राष्ट्रवादी राष्ट्रवादासोबत येत असेल तर त्यात अडचण काय? आम्ही स्वत: राष्ट्रवादासोबत आहोत. जर ते राष्ट्रवादाच्या दिशेने येत असतील तर त्यांचे स्वागत करायला हवं असं विधान सुधीर मुनगंटीवार म्हणले आहे. दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर येत आहेत. त्यात आता भाजपाच्या प्रमुख नेत्याने राष्ट्रवादी-भाजपा एकत्र येण्यावर केलेले विधान महत्त्वाचे ठरत आहे.
सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले,’ देशाच्या हितासाठी राष्ट्रवादी चर्चा करत असेल तर त्यांचे स्वागत करायला हवे. जर उद्धव ठाकरेंसोबत न जाता ते देशहिताच्या मार्गावर चालणार असतील तर त्यात आमची काहीही हरकत नाही. मार्ग मोठा आहे एक पाऊल त्यांच्याकडून पुढे यायला हवं. मग पाहूया. पुढे काय होते? महाराष्ट्रात जानेवारी, फेब्रुवारीत समीकरण बदलतील. काँग्रेस स्वत: वेगळी होईल असा दावाही त्यांनी केला.





