भाजप युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष मोनू कल्याणे याची रविवारी इंदूरमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मोनू मध्य प्रदेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री कैलाश विजयवर्गीय यांच्या खूप जवळचा होता. शहरातील एमजी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिमणबाग परिसरात ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या वैमनस्यातून पियुष आणि अर्जुनने मोनू कल्याणेवर गोळ्या झाडल्या. सध्या दोन्ही आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. इंदूर विधानसभा क्रमांक 03 च्या राजकारणात हस्तक्षेप करणारे मोनू कल्याणे हे कैलाश विजयवर्गीय यांचे पुत्र माजी आमदार आकाश विजयवर्गीय यांच्या खास लोकांमध्ये गणले जात होते. गोळी लागल्याने जखमी झालेल्या मोनूला त्याच्या मित्रांनी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हे वाचले का ? “राज्यातील सर्व मुस्लिमांनाही ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या” ; मनोज जरांगेंची मोठी मागणी