जळगाव : राज्यात करोना विषाणूची दुसरी लाट थैमान घालत असून देशात सर्वाधिक रुग्ण पुन्हा एकदा महाराष्ट्रात आढळून येत आहेत. दिवसेंदिवस ही रुग्णसंख्याही वाढते आहे. यात अनेक बडे अधिकारी, सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांनाही करोनाची बाधा होत आहे. यामध्ये आता भाजपा नेते गिरीश महाजन यांची करोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे.
गिरीश महाजन यांनी स्वतः ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. ते म्हणाले कि, दोन दिवसांपूर्वी ताप आल्यानंतर करोना चाचणी केली असता, मला करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच क्वारंटाईन होऊन उपचार घेत होतो. पुढील उपचारासाठी लवकरच मुंबई येथील सेंट जॉर्ज शासकीय रुग्णालयात दाखल होणार आहे, असे महाजनांनी सांगितले.
तसेच, गेल्या ३-४ दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी करोनाची चाचणी करून घ्यावी, अशी माझी विनंती आहे. आपणा सर्वांचे प्रेम व आशीर्वाद पाठीशी आहेतच, लवकरच नव्या जोमाने आपल्या सेवेत दाखल होईल, असेही गिरीज महाजन यांनी म्हंटले आहे.
गेल्या ३-४ दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी, अशी माझी विनंती आहे.
आपणा सर्वांचे प्रेम व आशीर्वाद पाठीशी आहेतच, लवकरच नव्या जोमाने आपल्या सेवेत दाखल होईल ! 🙏🏻
— Girish Mahajan (@girishdmahajan) March 18, 2021
दरम्यान, गिरीश महाजन यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावमध्ये आज भाजपाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेने याठिकाणी सांगली पॅटर्न राबवत भाजपला सत्तेतून बाहेर फेकले आहे. सेनेच्या महापौरपदाच्या आणि उपमहापौरपदाच्या उमेदवारांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. सेनेने तब्बल 45 मतं मिळवली आहे. त्यामुळे महापालिकेवर भगवा फडकला आहे.