चित्रा वाघ कडाडल्या; किरण मानेवर जोरदार हल्ला म्हणाल्या…

पुणे – स्टार प्रवाहवरच्या ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील मुख्य भूमिका असलेले अभिनेते किरण माने यांना या मालिकेतून हटवण्यात आले आहे. माने यांनी फेसबुकवर राजकीय पोस्ट केली असल्याने त्यांना काढून टाकण्यात आले असल्याची चर्चा आहे. यावर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी माने यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
मुलीच्या वयाच्या अभिनेत्रीशी गैरवर्तन करणा-या किरण मानेला प्रोडक्शन हाउसनं हाकलून दिलयं..मग मानेनं नवं नाट्य उभं केलं
महिलांचा विनयभंग व PM वर विखारी टिका करणा-या हरामखोराला सत्ताधारी पाठीशी घालताहेत
कोण आहेत मानेचे बोलवते धनी ??
या सोंगाड्यावर कारवाई करा
शिक्षा झालीचं पाहीजे— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) January 17, 2022
चित्रा वाघ म्हणाल्या की, ”मुलीच्या वयाच्या अभिनेत्रीशी गैरवर्तन करणा-या किरण मानेला प्रोडक्शन हाउसनं हाकलून दिलयं..मग मानेनं नवं नाट्य उभं केलं महिलांचा विनयभंग व PM वर विखारी टिका करणा-या हरामखोराला सत्ताधारी पाठीशी घालताहेत कोण आहेत मानेचे बोलवते धनी ?? या सोंगाड्यावर कारवाई करा शिक्षा झालीचं पाहीजे” असे ट्वीट चित्रा वाघ यांनी केले आहे.





