भाजपचे साडेतीन लोक जेलमध्ये पाठविण्याची तयारी सुरू; संजय राऊतांचा गर्भित इशारा

Updated On:
भाजपचे साडेतीन लोक जेलमध्ये पाठविण्याची तयारी सुरू; संजय राऊतांचा गर्भित इशारा

मुंबई – केंद्रीय तपास यंत्रणांमुळे त्रस्त झालेलं महाविकास आघाडी सरकार आगामी काळात राज्यातील भाजपला लक्ष्य करणार अशी शक्यता आहे. शिवसेनेने तशी तयारी केल्याचं दिसून येत असून खुद्द शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला गर्भित इशारा दिला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत म्हणाले की, उद्या शिवसेना भवनात ४ वाजता शिवसेनेची पत्रकार परिषद होणार आहे. मी असेलच. आमचे शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी, आमदार, खासदार, मंत्री सर्वजण असतील. केंद्रीय तपास यंत्रणांची जी काही दादागिरी सुरू आहे. शिवसेनेवर ज्या पद्धतीने खोट्या आरोपांचा चिखल उडविण्यात येतोय. त्याला प्रत्युत्तर देण्यात येईल, असंही राऊत म्हणाले.

राऊत पुढं म्हणाले की, ते सतत सांगतायत हा जेलमध्ये जाईल, तो जाईल. अनिल देशमुखांच्या कोठडीच्या बाजुला असेल. पण मी सांगू इच्छितो, पुढील काही दिवसांत भाजपचे साडेतीन लोक त्याच कोठडीत असेल जिथे अनिल देशमुख आहेत. तर अनिल देशमुख बाहेर असतील, असा दावा राऊत यांनी केला.

महाराष्ट्रात सरकार आहे, हे लक्षात घ्यावं. हे सरकार शिवसेनेच्या नेतृत्वाखाली हेही लक्षात ठेवावं. सरकार हे सरकार असतं. त्यामुळे पाहू कोणात किती दम आहे. तुम्ही आम्हाला आव्हान देताय, धमकावत आहात. तर मग महाराष्ट्र भाजपमधील साडेतीन लोकांना कारागृहात पाठविण्याची तयारी सुरू केल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.

आणखी संबंधित बातम्या

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार तातडीने दिल्लीत दाखल; मोठी राजकीय घडामोड घडणार?

2026-04-01 22:36:25

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार तातडीने दिल्लीत दाखल; मोठी राजकीय घडामोड घडणार?

Congress : भाजपला मदत करणे पडले महागात.! काँग्रेसच्या ७ नगरसेवकांचे केले निलंबन

2026-04-01 18:14:24

Congress : भाजपला मदत करणे पडले महागात.! काँग्रेसच्या ७ नगरसेवकांचे केले निलंबन

Sanjay Raut : जैन मुन्नी आचार्य नयन पद्मसागर यांचं महाराणी ताराराणीबद्दल वादग्रस्त विधान; संजय राऊत कडाडले, फडणवीस, शिंदेंना थेट म्हणाले...

2026-04-01 11:34:02

Sanjay Raut : जैन मुन्नी आचार्य नयन पद्मसागर यांचं महाराणी ताराराणीबद्दल वादग्रस्त विधान; संजय राऊत कडाडले, फडणवीस, शिंदेंना थेट म्हणाले...

Leander Paes : निवडणुकीपूर्वी तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का ! लिएंडर पेसचा भाजपात प्रवेश

2026-03-31 15:54:11

Leander Paes : निवडणुकीपूर्वी तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का ! लिएंडर पेसचा भाजपात प्रवेश

Akhilesh Yadav : रुपयाप्रमाणेच भाजपची प्रतिमा घसरली.! भाजप नेत्यांच्या भ्रष्टाचारावर अखिलेश यांचा टोला

2026-03-31 15:50:01

Akhilesh Yadav : रुपयाप्रमाणेच भाजपची प्रतिमा घसरली.! भाजप नेत्यांच्या भ्रष्टाचारावर अखिलेश यांचा टोला