प्रविण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा भाजपशी संबध असल्याचा आरोप; बावनकुळेंनी दिले स्पष्टीकरण

Chandrashekhar Bawankule | संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांच्या अंगावर शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले. प्रविण गायकवाड यांच्यावरील या हल्ल्यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. या हल्ल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत भाजपवर निशाणा साधला.
प्रविण गायकवाड यांच्यावर हल्ला करणारे दीपक काटे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, भाजपचा सक्रिय पदाधिकारी आहे. तसेच चंद्रशेखर बावनकुळे यांचे निकटवर्तीय असल्याचा आरोप अंधारे यांनी केला. यावर मंत्री बावनकुळे यांनी स्पष्टीकरण देत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
‘खालच्या लेव्हलचं कृत्य करणं भाजपच्या रक्तात नाही’
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “प्रवीण गायकवाड यांच्या हल्ल्याचा भारतीय जनता पार्टीशी काहीही संबंध नाही. अशा खालच्या लेव्हलचं कृत्य करणं भाजपच्या रक्तात नाही. या प्रकरणात कारवाई झाली पाहिजे. प्रवीण गायकवाड यांच्यासोबत जे घडलं, याप्रकरणी पोलिसांनी चौकशी केली पाहिजे. आमचा संबंध नाही, भाजपचा कार्यकर्ता आहे पण कारवाई झाली पाहिजे,” असंही बावनकुळेंनी स्पष्ट केलं. Chandrashekhar Bawankule |
सुषमा अंधारे ट्विट
प्रविण गायकवाड यांच्यावर हल्ला करणारा आरोपी दीपक काटे रेकॅार्डवरील गुन्हेगार आहे. भाजपाचा सक्रिय पदाधिकारी आहे. बावनकुळेंचा निकटवर्तीय आहे. या कामगिरीसाठी एखादी आमदारकी/खासदारकी/महामंडळ देऊनच टाका. भाजपच्या पात्रता चाचणी परीक्षेत पोरगा अव्वल नंबराने पास झालाय, असे ट्विट करत सुषमा अंधारे यांनी भाजपला टोला लगावला होता. Chandrashekhar Bawankule |
हेही वाचा :





