नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीपूर्वी तामिळनाडूतील १5 माजी आमदार आणि 1 माजी खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यातील बहुतांश नेते हे एआयएडीएमकेमधील आहेत. या पक्ष प्रवेशामुळे दक्षिणेकडील राज्यात आपले अस्तित्व मजबूत करण्यात भाजपला यश मिळाल्याचे मानले जात आहे.
हा पक्षप्रवेश केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष के अन्नामलाई यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी राजीव चंद्रशेखर यांनी राज्यातील सत्ताधारी द्रमुक आणि मुख्य प्रतिस्पर्धी एआयएडीएमकेवर निशाणा साधला.
भाजपमध्ये दाखल झालेल्यांची यादीत एडीएमकेचे माजी आमदार के वाडिवेल, चॅलेंजर दुरासामी, पीएस कंडासामी, आर चिन्नासामी, माजी मंत्री गोमथी श्रीवासन, व्हीआर जयरामन, एसएम वासन, पीएस अरुल, एस गुरुनाथन, आर राजेंद्रन, सेल्वी यांचा समावेश आहे.
राजीव चंद्रशेखर म्हणाले, आगामी लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत, अशा परिस्थितीत मोठ्या संख्येने माजी आमदार आणि खासदारांचा भाजपमध्ये प्रवेश केल्याने दक्षिणेतील राज्यात पक्षाची वाढती विश्वासार्हता दर्शवते. तसेच लोकसभा निवडणुकीत भाजप 370 जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला.