उत्तराखंडमध्ये भाजपमधून 6 बंडखोरांची हकालपट्टी
Updated On:

डेहराडून –भाजपने उत्तराखंडमधील सहा बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात त्यांनी अर्ज दाखल केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
हकालपट्टी करण्यात आलेल्यांमध्ये रुद्रपूरचे आमदार राजकुमार ठुकराल, टिकाप्रसाद मैखुरी, महावीरसिंग रंगड, जितेंद्र नेगी, धीरेंद्र चौहान आणि मनोज शाह यांचा समावेश आहे, या सर्वांना सहा वर्षांसाठी पक्षातून हकलण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाला यावेळी तिकीट वाटपानंतर मोठ्या बंडखोरीचा सामना करावा लागला आहे. अनेक भाजप नेत्यांनी पक्षाच्या नामफलकाची तसेच कार्यालयांचीही मोडतोड केल्याच्या घटना या राज्यांत घडल्या आहेत. तिकीट नाकारलेल्या अनेक भाजप आमदारांनी व नेत्यांनी पक्षाच्या उत्तराखंडमधील कार्यपद्धतीवरही उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.





