सावंतवाडी : मी आठ दिवसांत भाजपात जाणअर असून यावेळी कोकणातून भाजपाचा एकही खासदार आला नाही मात्र, पुढील खेपेस कोकणातील दोन्ही खासदार भाजपाचे असतील, असे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सांगितले
आपला भाजपा प्रवेश आठ दिवसांत होणार असून त्याबात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे, असे श्री. राणे म्हणाले. ते सावंतवाडीत पत्रकारांशी बोलतहोते. नारायण राणे यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करत भाजपामध्ये जाण्याबाबत कार्यकर्त्यांचं मत जाणून घेतलं. सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी आपल्यासोबत राहणार असल्याचाही दावा यावेळी नारायण राणे यांच्याकडून कऱण्यात आला आहे. तसंच येत्या आठ दिवसात भाजपामध्ये प्रवेश होईल असं त्यांनी सांगितलं आहे.
मी शिवसेना सोडली तेव्हा कार्यकर्तेही कॉंग्रेस पक्षात माझ्यासह आली होते. त्यामुळे भाजपात जाईन तेव्हाही ते माझ्यासोबत असतील. भाजपात प्रवेश केल्यानंतर कोकणात पक्ष वाढवण्याचं काम आपण करु असे त्यांनी स्पष्ट केले.