Rajya Sabha | जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी भाजपसाठी एक दिलासायदायक बातमी समोर आली आहे. राज्यसभेत भाजपने शतक ठोकले आहे. म्हणजेच भाजप खासदारांची संख्या १०० चा महत्त्वाचा आकडा ओलांडून १०२ पर्यंत पोहोचली आहे. अलीकडेच नवनिर्वाचित झालेले राष्ट्रपती नियुक्त ३ सदस्यांचा यात समावेश झाला आहे. अलीकडेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विविध क्षेत्रात प्रतिष्ठित असलेल्या ४ सदस्यांची नियुक्ती राज्यसभेत खासदार म्हणून केली आहे. ज्यात प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम, माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला, सामाजिक कार्यकर्ते सी सदानंदन मास्टर आणि राजकीय इतिहासकार मिनाक्षी जैन यांचा समावेश आहे. मागील महिन्यात शपथ घेणाऱ्या या ४ सदस्यांपैकी ३ सदस्य भाजपाचे आहेत. दरम्यान, भारतीय राजकारणात भाजप हा दुसरा राजकीय पक्ष ठरला आहे, ज्याने राज्यसभेत 100 चा आकडा ओलांडला आहे. 1988 आणि 1990 च्या दरम्यान काँग्रेसने असा पराक्रम केला होता. यापूर्वी मे 2022 मध्येही भाजपने शंभराचा आकडा गाठला होता, तेव्हा त्यांच्याकडे राज्यसभेत 101 सदस्य होते. Rajya Sabha | राज्यसभेचं संख्याबळ किती? राज्यसभेत सध्या २४० खासदार आहेत. ज्यात १२ सदस्य नामनिर्देशित आहेत. ५ जागा अद्याप खाली आहेत. राज्यसभेत एकूण 245 सदस्य असतात आणि कमाल २५० असू शकतात. यापैकी २३८ निवडून येतात, तर १२ नामनिर्देशित असतात. सध्याच्या सभागृहात NDA खासदारांची संख्या १३४ इतकी आहे. सध्या एकट्या भाजपाकडे १०२ खासदार आहेत. या सभागृहात बहुमतासाठी १२१ खासदारांपेक्षा जास्त सदस्य भाजपा सरकारकडे आहेत. संख्याबळाच्या दृष्टीने उपराष्ट्रपति निवडणुकीत भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांकडे विरोधकांपेक्षा जास्त खासदार आहेत. विरोधी पक्ष उपराष्ट्रपती निवडणुकीत आपला उमेदवार उभा करणार की नाही, हे अजून निश्चित झालेले नाही, तरीही त्यांनी 2017 आणि 2022च्या निवडणुकीत पूर्ण ताकदीने लढा दिला होता. Rajya Sabha | उपराष्ट्रपती निवडणुकीच्या मतदारसंघात फक्त लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार असतात. राज्यसभेचे निवडून आलेले २३३ खासदार, राज्यसभेचे राष्ट्रपती नियुक्त १२ नामनिर्देशित खासदार आणि लोकसभेचे ५४३ खासदार मतदान करू शकतात. अशा प्रकारे एकूण ७८८ लोक मतदान करू शकतात. भाजपकडे लोकसभेत २४० आणि राज्यसभेत १०२ सदस्य आहेत. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मित्रपक्षांसह सरकारकडे ४५७ पेक्षा जास्त सदस्य आहेत. काँग्रेसकडे लोकसभेत ९९ आणि राज्यसभेत २७ सदस्य आहेत. Rajya Sabha | 2024 च्या निवडणुकीत मोठा धक्का भाजपसाठी ही मोठी दिलासादायक बाब आहे, कारण 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना धक्का बसला होता. 2019 च्या तुलनेत त्यांच्या जागा बर्याच कमी झाल्या होत्या. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना 302 जागा मिळाल्या होत्या, तर 2024 मध्ये ते फक्त 240 जागांवरच विजय मिळवू शकले. जे की त्यावेळेस भाजप कडून 400 पारचा नारा देण्यात आला होता. पण बहुमतासाठी आवश्यक 272 जागांपासूनही भाजप बरेच मागे राहिले. Rajya Sabha | हेही वाचा : Praveen Gaikwad : प्रवीण गायकवाडांनी घेतली शरद पवारांची भेट; दिलेला सल्ला ऐकला, म्हणाले आता आमची ताकद…