Sanjay Bhende : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखेर भाजपने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. नेहमीप्रमाणे धक्कातंत्राचा वापर करत पक्षाने काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली असून, यामध्ये संजय भेंडे यांचा समावेश आहे. (Sanjay Bhende) भाजपने विधान परिषदेच्या पाच जागांसाठी उमेदवार जाहीर केले असून नागपूरमधून संजय भेंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भेंडे हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. (Sanjay Bhende) संजय भेंडे यांनी गडकरी यांच्या अनेक निवडणुकांमध्ये निवडणूक प्रमुख म्हणून महत्त्वाची जबाबदारी सांभाळली आहे. तसेच त्यांनी पक्षाच्या शहर आणि प्रदेश पातळीवर विविध पदांवर काम करत संघटनात्मक बळ वाढवण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. सध्या ते नागपूर नागरिक सहकारी बँकेचे अध्यक्ष असून सहकार क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान मानले जाते. (Sanjay Bhende) कोण आहेत संजय भेंडे? संजय भेंडे हे RSS च्या विचारधारेतून घडलेले नेते आहेत. त्यांनी संघात प्रशिक्षक म्हणूनही काम केले आहे. ओबीसी चेहरा म्हणून त्यांची ओळख असून, पक्षनिष्ठा आणि शिस्त यासाठी ते ओळखले जातात. (Sanjay Bhende) २०१४ पासून त्यांनी नितीन गडकरी यांच्या निवडणुकांमध्ये सातत्याने महत्त्वाची भूमिका निभावली आहे. नुकत्याच झालेल्या मनपा निवडणुकीतही त्यांनी भाजपचे निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडली होती. (Sanjay Bhende) याआधी अनेक वेळा त्यांचे नाव चर्चेत आले होते, मात्र उमेदवारी हुकली होती. यंदा मात्र त्यांना संधी मिळाल्याने नागपूर आणि विदर्भातील राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे. (Sanjay Bhende)