Maharashtra Politics : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, परभणी जिल्ह्यात पाठिंबा देण्याच्या मुद्यावरुन भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. शहरातील प्रभाग 4 मध्ये राष्ट्रवादी आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यामध्ये देशमुख हॉटेल परिसरात ही घटना घडली. माहीतीनुसार, प्रभाग क्र 4 मधील राष्ट्रवादीचे उमेदवार अक्षय देशमुख यांनी एकनाथ शिंदेसेनेचे उमेदवार वामन मोरे यांनी अर्ज मागे घेवून भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे त्यांनी मारहाण केली असल्याचा आरोप केला आहे. तर मला त्यांनी अनेक वेळा उमेदवारी मागे घेण्यासाठी पैसे द्यावे म्हणून पैसे मागितले. पण मी त्यांना भाव दिला नाही. मी कशाला मारहाण करु तो आरोप चुकीचा असल्याचे अक्षय देशमुख यांनी सांगितले आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी मध्यस्ती करत तत्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.