जयपूर – भारतीय जनता पक्षानेही आपले राजस्थानातील 12 आमदार गुजरातला हलवले आहेत. भारतीय जनता पक्षाचे नेते अशोक लाहोटी यांनी एका विशेष विमानाने सहा आमदार अहमदाबादला नेले आहेत. राजस्थानात येत्या 14 ऑगस्टला अशोक गेहलोत सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावर मतदान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर या आमदारांना हलवण्यात आले आहे.
त्या विषयी बोलताना लाहोटी म्हणाले की, या आमदारांना विनाकारण त्रास दिला जात आहे. त्यामुळे ते स्वत:हून गुजरातला तीर्थयात्रेसाठी जात आहेत. ते तेथे सोमनाथ मंदिराला भेट देतील, असे त्यांनी सांगितले. शुक्रवारी सहा आणि शनिवारी सहा असे एकूण बारा आमदार भाजपने राजस्थानातून हलवून गुजरातला नेले आहेत. कॉंग्रेसकडून या आमदारांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचा आरोपही लाहोटी यांनी केला.