राहुल गांधींविरोधात भाजपचे आंदोलन

कराड  – कराड शहर भाजपाच्या वतीने राहुल गांधींविरोधात कराडात निदर्शने करण्यात आली. राहुल गांधी चोर है, चौकीदार प्युअर है च्या घोषणांचा नारा भाजपा कार्यकर्त्यांनी दिल्या.

यावेळी जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, कराड शहर भाजपाचे अध्यक्ष एकनाथ बागडी, मुकुंद चरेगावकर, सुदर्शन पाटसकर व भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी विक्रम पावसकर म्हणाले, कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांना कोणताही अभ्यास नाही. लोकसभा निवडणुकीच्या काळात भाजपचे नेते व भारतीय जनता पार्टी यांच्यावर ते अखंड टीका करत होते.

दोन दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने राफेल संदर्भात निकाल दिल्याने भाजपचा विजय झाला आहे. त्यामुळे राहुल गांधी हेच चुकीचे ठरले आहेत. त्यांचा कराड शहर भाजपच्या वतीने आम्ही निषेध करीत आहोत. यावेळी एकनाथ बागडी, घन:श्‍याम पेंढाकरकर, रोहिणी शिंदे यांनीही मनोगत व्यक्‍त करून राहुल गांधी यांचा निषेध केला. राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी. त्यांच्याकडे कोणतेही संरक्षणाचे ज्ञान नाही.

त्यांनी अभ्यास करूनच वक्‍तव्ये करावीत. देशातील जनता त्यांना कधीच सत्तेवर येऊन देणार नाही. त्यांनी भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले होते. कॉंग्रेसचा आजपर्यंतचा इतिहास पाहता कोणत्याही प्रकारचा पारदर्शक कारभार दिसून येत नाही. संपूर्ण गांधी खानदानच चोर असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)