Salman Khan Firing Case | बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी पुन्हा एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. या आरोपीला संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आहे. त्यामुळे बिश्नोई गँगचे छत्रपती संभाजीनगर कनेक्शन समोर आले आहे. संभाजीनगरमधून बिश्नोई गँगसाठी रेकी करणे, शस्त्रांची डिलिंग करणे यावरून अटक करण्यात आली आहे. पनवेल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिश्नोई गँगसाठी वसीम चिकना बिश्नोई गँगसाठी रेकी करणे, शस्त्रांची डिलिंग करणे असे काम करत होता. या बाबत माहिती मिळताच पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथून त्याला अटक करण्यात आली आहे. वसीम जालना जिल्ह्यातील असून यामुळे छत्रपती संभाजीनगर शहराचे बिष्णोई गँग कनेक्शन उघड झाले आहे. जालना येथील अलंकार अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या मोहम्मद उर्फ वसीम चिकनाला पनवेल पोलिसांनी नुकताच अटक केली. सलमान खान धमकी प्रकरणी आतापर्यंत ५ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी केली असता वसीम चिकनाचे नाव समोर आले होते. तत्पूर्वी, सलमानच्या घरावर 14 एप्रिल रोजी पहाटे 4.15 च्या सुमारास गोळीबार झाला होता. हल्लेखोरांनी एकूण 4 गोळ्या बंगल्याच्या दिशेने झाडल्या. त्यापैकी एक गोळी घरात शिरली, तर उर्वरित घराच्या भिंतीवर लागल्या. पोलिसांनी या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर तपास सुरू केला होता. लॉरेन्स बिश्नोई गँगने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. पोलिसांनी या हल्ल्याप्रकरणी गुजरात व पंजाबमधून प्रत्येकी 2 अशा एकूण 4 जणांना अटक केली होती.