बिजिंग : करोना विषाणूंच्या कहर सुरू असतातनाच आता चीनला पुन्हा बर्ड फ्लूच्या विषाणूंनी हैराण केले आहे. त्यामुळे या संकटाला चीन कसे सामोरे जातो ते पाहावे लागणार आहे. ही माहिती चीनच्या मंत्र्यांनीच दिली आहे. बर्ड फ्ल्यूसाठी कारणीभूत ठरणारा एच5एन1 हा विषाणू हुबेई प्रांतात आढळला आहे. याच प्रांतात करोना विषाणूंनी धुमाकूळ घातला आहे.
याबाबत अधिम माहिती अशी की, शाओयांग या गावात या विषाणूच्या प्रादुर्भावाने साडेचार हजार कोंबड्या मरण पावल्या आहेत. त्यानंतर साथ प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहेत. हा फ्ल्यू पसरू नये म्हणून तातडीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र अद्याप मानव या आजाराने बाधीत झाल्याचे वृत्त नाही.