मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर नेहमीच स्पशल मीडियावर सक्रिय असतात. बॉलीवूडचे हे स्टार जोडपे आई-वडील झाल्यापासून त्यांचा बहुतांश वेळ त्यांची मुलगी देवीसोबत घालवत असतात. बिपाशा आणि करण सोशल मीडियावर अनेकदा त्यांच्या मुलीसोबतचे फोटो शेअर करत असतात. मात्र आता आई बिपाशाने आपल्या मुलीचा चेहरा सर्वांना दाखवला आहे.
View this post on Instagram
करण आणि बिपाशा आपली मुलगी देवीसोबतचे सुंदर क्षण कॅमेऱ्यात कैद करून शेअर करत आहेत. हे स्टार्स अनेकदा त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर देवीचे फोटो पोस्ट करत असतात. पण या जोडप्याने कधीही आपल्या मुलीचा चेहरा स्पष्टपणे दाखवला नव्हता. मात्र आता बिपाशा आणि करणने आपल्या मुलीचा पूर्ण चेहरा सर्वांसमोर उघड केला आहे. या जोडप्याने आपल्या मुलीची सर्वांशी ओळख करून दिली आहे.
बिपाशाने तिच्या लाडक्या मुलीचे दोन फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये छोटी देवी गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. ती फोटोत खूप गोंडस दिसत आहे. यामध्ये बिपाशाच्या मुलीचा हसरा चेहरा स्पष्टपणे पाहायला मिळतो. या पोस्टसोबत बिपाशाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, हॅलो वर्ल्ड… मी देवी आहे. यूजर्ससोबतच स्टार्सनीही देवीच्या फोटोंवर कमेंट केल्या आहेत. यावर भाष्य करताना साऊथ अभिनेत्री काजल अग्रवालनेही देवीचं क्यूट असं वर्णन केलं आहे. त्यांना आशीर्वादही दिले.