Bipasha Basu : अभिनेत्री मृणाल ठाकूरचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात तिने बिपाशा बसूला ‘मर्दाना’ म्हटल्याचे दिसत आहे. या व्हिडिओमुळे मृणालवर टीका होत असून बिपाशा बसूनेही इंस्टाग्रामवर अप्रत्यक्षपणे प्रत्युत्तर दिले आहे. हा व्हिडिओ त्या काळातील आहे, जेव्हा मृणाल ‘कुमकुम भाग्य’ मालिकेत काम करत होती. व्हिडिओमध्ये तिचा को-स्टार अर्जित तनेजा सांगतो की त्याला कशा प्रकारची मुलगी लग्नासाठी हवी आहे. मृणाल त्याला विचारते, “तुला मर्दाना आणि मसल्स असलेली मुलगी हवी आहे का?” अर्जित म्हणतो,“मला बिपाशा बसूसारखी फिजीक असलेली मुलगी आवडते.” त्यावर मृणाल म्हणते,“जा मग बिपाशाशी लग्न कर. पण मी बिपाशापेक्षा चांगली आहे.” हा व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेकांनी मृणालवर बॉडी-शेमिंगचा आरोप केला. यावर बिपाशा बसूने इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले की, “मजबूत महिला एकमेकींना पुढे नेतात. सुंदर स्त्रिया, मसल्स वाढवा. आपण मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या मजबूत असलं पाहिजे. महिलांना मसल्स नसावेत किंवा त्या ताकदवान नसाव्यात ही जुनाट मानसिकता तोडायला हवी.” ओरीनेही मृणालवर नाराजी व्यक्त करत इंस्टाग्रामवर कमेंट केली, “ही बाई काय फुंकते आहे?”