BREAKING ! आदित्य ठाकरेंच्या गाडीला धडकला दुचाकीस्वार.. शिवसेना भवनसमोर घडला अपघात

मुंबई – मुंबईत सध्या जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. अशात शिवसेना भवनसमोर माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या गाडीला एक दुचाकीस्वार धडकल्याने समजते. हा अपघात होताच ठाकरे यांच्या सुरक्षा रक्षकांनी तातडीने दुचाकीस्वाराला बाजूला घेतले.
आदित्य ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा शिवसेना भवनासमोरून उजवीकडे वळत असताना एक दुचाकीस्वार पाठीमागून आला आणि आदित्य ठाकरेंच्या गाडीला खेटला. यामुळे दुचाकीस्वार रस्त्यावर पडला इतक्यात बाजूला असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्याला उचलून बाजूला केले. यावेळी दोन्हही वाहने हळू असल्याने कोणाला जास्त दुखापत झाली नाही.
यानंतर संबंधित दुचाकीस्वार पळून जाण्याच्या प्रयत्नात होता मात्र सुरक्षा रक्षकांनी त्याला पकडले. त्याला किरकोळ खरचटले असल्याचे समजते. पोलिसांनी देखील त्या दुचाकीस्वाराची चौकशी केली यानंतर आदित्य ठाकरे यांच्या ताफ्याला पुढे जाण्यासाठी रस्ता मोकळा करून देण्यात आला.
या घटनेनंतर आदित्य ठाकरे यांनी त्या बाइकस्वाराची विचारसपूस देखील केली. आज दुपारी शिवसेना भवनसमोर हा प्रकार घडल्याने यावेळी रस्त्यांवर असलेल्या अनेकांचा श्वास रोखला गेला. काही काळ या मार्गावर वाहनांची किरकोळ गर्दी झाली मात्र सुरक्षा रक्षकांच्या तत्परतेमुळे पुढील वाहतूक लगेच सुरु होण्यास मदत झाली.




