Bihar Politics: नीतीश कुमार यांनी मंगळवारी (१४ एप्रिल २०२६) मंत्रिमंडळाची अखेरची बैठक घेतल्यानंतर राज्यपालांची भेट घेऊन बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर झालेल्या एनडीए विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सम्राट चौधरी यांची नेतेपदी निवड करण्यात आली. त्यामुळे तेच बिहारचे पुढील मुख्यमंत्री होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. बुधवारी लोकभवन येथे शपथविधी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, उद्या बुधवारी सकाळी 11 वाजता सम्राट चौधरी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकीसाठी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान हे निरीक्षक म्हणून पटना येथे उपस्थित होते. याशिवाय भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितिन नवीन, बी.एल. संतोष आणि विनोद तावडे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. कोण आहेत सम्राट चौधरी? Bihar Politics सम्राट चौधरी हे सध्या बिहारचे उपमुख्यमंत्री असून गृह खात्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. ते बिहार विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेही राहिले आहेत. तसेच ते भाजपचे प्रदेशाध्यक्षही होते. त्यांचा राजकीय प्रवास राष्ट्रीय जनता दल (RJD) पासून सुरू झाला. Bihar Politics: सम्राट चौधरी यांचा RJD पासून BJP पर्यंतचा प्रवास; उद्या सकाळी 11 वाजता घेणार बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ ते मुंगेर जिल्ह्यातील असून त्यांचे वडील शकुनी चौधरी हे समता पक्षाचे संस्थापक सदस्य होते. शकुनी चौधरी हे एकेकाळी लालू प्रसाद यादव यांचे निकटवर्तीय मानले जात होते. १९९० पासून सक्रिय राजकारण – सम्राट चौधरी १९९० पासून सक्रिय राजकारणात आहेत. १९९५ मध्ये एका राजकीय प्रकरणात त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता. १९९९ मध्ये राबड़ी देवी यांच्या सरकारमध्ये त्यांनी कृषीमंत्री म्हणून काम केले. २००० आणि २०१० मध्ये ते परबत्ता विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. २००५ नंतर RJD सत्तेबाहेर गेल्यानंतरही ते काही काळ पक्षासोबत राहिले. २०१४ मध्ये त्यांनी जनता दल (युनायटेड) (JDU) मध्ये प्रवेश केला आणि जीतन राम मांझी यांच्या सरकारमध्ये शहरी विकास व गृहनिर्माण मंत्री म्हणून काम पाहिले. यानंतर २०१८ मध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टी (BJP) मध्ये प्रवेश केला. एनडीए सरकारमध्ये ते पंचायती राज मंत्री राहिले आहेत. २०२५ मध्ये तारापूर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवून विजय मिळवला. आता एनडीएच्या निवडीमुळे सम्राट चौधरी यांच्या हाती बिहारची धुरा येणार असून, त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यात प्रथमच भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होणार आहे. Bihar Politics हेही वाचा – बिहारमध्ये सत्तांतराचा मार्ग मोकळा; नितीश कुमार यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा बिहारमध्ये कोणत्या पक्षाच्या किती जागा? नोव्हेंबर २०२५ मध्ये पार पडलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानुसार, सत्ताधारी आघाडी (NDA) – एकूण २०२ जागा NDA ने या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवत विधानसभेत प्रचंड बहुमत प्राप्त केले आहे. भारतीय जनता पार्टी (BJP): ८९ जनता दल (युनायटेड) (JDU): ८५ लोक जनशक्ती पार्टी (रामविलास): १९ हिंदुस्तानी अवाम मोर्चा (HAM): ५ राष्ट्रीय लोक मोर्चा (RLM): ४ विरोधी आघाडी (महागठबंधन) – एकूण ३५ जागा या निवडणुकीत महागठबंधनला मोठ्या पिछाडीचा सामना करावा लागला. राष्ट्रीय जनता दल (RJD): २५ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस: ६ CPI(ML) लिबरेशन: २ CPI(M): १ इंडियन इन्क्लुसिव पार्टी (IIP): १ ३. इतर पक्ष – ६ जागा AIMIM: ५ बहुजन समाज पार्टी (BSP): १ विधानसभेत बहुमतासाठी १२२ जागांची गरज असते, तर NDA कडे २०२ जागांचे भक्कम संख्याबळ आहे. ८९ जागांसह भाजप हा बिहारमधील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, तर जेडीयू (८५) दुसऱ्या क्रमांकावर आहे.