“इंडिया’ आघाडीचे सरकार स्थापन होणार? नितीश कुमार यांना बड्या नेत्याचा फोन, उपपंतप्रधान बनवण्याची ऑफर

Bihar Lok Sabha Election 2024: 18व्या लोकसभेचे चित्र आता हळूहळू स्पष्ट होत आहे. एनडीए 297, इंडिया 228 जागांवर आघाडीवर आहे. 10 वर्षांनंतर पुन्हा एकदा केंद्रात संमिश्र सरकार स्थापन होणार आहे. दरम्यान, बिहारमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नितीश कुमार यांना इंडिया आघाडीत येण्याचे निमंत्रण दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना उपपंतप्रधानपदाची ऑफर देण्यात आली आहे.
नितीश कुमार यांनी इंडिया विरोधी आघाडीची पायाभरणी केली होती, मात्र बिहारमधील मित्रपक्ष आरजेडीवर नाराज होऊन ते फेब्रुवारीमध्ये एनडीएमध्ये सामील झाले. आतापर्यंतच्या ट्रेंडनुसार भाजप 241 जागांवर आघाडीवर आहे. तर एनडीए 297 जागांवर पुढे आहे. तर इंडिया आघाडी 228 जागांवर पुढे आहे. बिहारमध्ये नितीश कुमार यांचा जेडीयू पक्ष 14 जागा आघाडीवर आहे. दरम्यान, इंडिया आघाडी आता संख्या जुळवण्याच्या तयारीला लागला आहे.





