Bihar Election Results 2025। बिहार विधानसभा निवडणूक २०२५चा अंतिम निकाल शुक्रवार, १४ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. बिहार विधानसभेच्या सर्व २४३ जागांसाठी मतमोजणीची सुरुवात सकाळी ८.०० वाजता झाली आहे.दरम्यान , सुरुवातीच्या कलांमध्ये एनडीएला आघाडी मिळताना दिसून येत आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये एनडीएने १०० चा आकडा पार केल्याचे समोर आले आहे. ते ११० जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान, महाआघाडी ७७ जागांवर आघाडीवर आहे. आरजेडी ६२ जागांवर आघाडीवर असून सर्वात मोठा पक्ष आहे. भाजप ५८ जागांवर आघाडीवर आहे. कोण कुठे आघाडीवर आहे? Bihar Election Results 2025। * तरारी विधानसभा मतदारसंघात भाजप आमदार विशाल प्रशांत आघाडीवर आहेत. * राजदचे आमदार राहुल तिवारी शाहपूर विधानसभा मतदारसंघात आघाडीवर आहेत. * आरा विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार संजय टायगर आघाडीवर आहेत. * बेगुसरायमध्ये भाजप उमेदवार कुंदन कुमार आघाडीवर आहेत. * दानापूरमध्ये रामकृपाल यादव आघाडीवर आहेत. * पूर्णिया सदर विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार विजय खेमका आघाडीवर आहेत. * धमदहा विधानसभा मतदारसंघात जेडीयू उमेदवार लेसी सिंह आघाडीवर आहेत. * बनमनखी विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार कृष्ण कुमार ऋषी आघाडीवर आहेत. * अमौर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार आघाडीवर आहेत. * कसबा विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार आघाडीवर आहेत.