Bihar Election Result 2025: बिहार विधानसभा निवडणुकीत या वेळेस अनेक सेलिब्रिटी उमेदवारांनी खास चर्चा मिळवली आहे. भोजपुरी स्टार्स, लोकगायक व प्रसिद्ध कलाकारांनी विविध पक्षांमधून निवडणूक रिंगणात उडी घेतली. आज निकाल लागणार असल्याने या सेलिब्रिटींच्या भवितव्यावर शिक्कामोर्तब होईल. खेसारी लाल यादव – भोजपुरी सुपरस्टार आता राजकारणात भोजपुरी सिनेमा आणि संगीत जगतातील मोठं नाव म्हणजे खेसारी लाल यादव. आतापर्यंत 70 पेक्षा जास्त चित्रपट 5000 हून अधिक गाणी संगीताचा प्रभाव बॉलिवूडपर्यंत; त्यांचं एक गाणं अलीकडेच ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ चित्रपटात वापरलं आहे. खेसारी यांनी या निवडणुकीत राजद (RJD) कडून छपरा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. मैथिली ठाकूर – लोकगायिकेचा राजकीय पहिलावहिला प्रयत्न लोकप्रिय लोकगायिका मैथिली ठाकूर यांचा जन्म मधुबनी येथे झाला. लहानपणापासूनच संगीत शिक्षण आणि स्टेज परफॉर्मन्स करत त्या प्रसिद्ध झाल्या. 2011: ‘लिटिल चॅम्प्स’ शोमध्ये सहभाग 2017: ‘रायजिंग स्टार’मध्ये ‘ॐ नमः शिवाय’ने मिळवली ओळख ‘होली रे रसिया’, ‘हरि नाम नहीं तो जीना क्या’ यांसारखी गाणी खूप प्रसिद्ध आता त्यांनीही राजकारणाची वाट धरली असून भाजप (BJP) कडून अलीनगर मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे. पवन सिंह यांच्या पत्नी – ज्योती सिंह मैदानात निर्दलीय भोजपुरी अभिनेता पवन सिंह जिथे भाजपचा प्रचार करताना दिसले, तिथे त्यांची पत्नी ज्योती सिंह या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून उतरल्या आहेत. त्यांनी काराकाट या मतदारसंघातून अर्ज दाखल केला आहे. अलीकडेच त्यांच्या आणि पवन सिंह यांच्या वैवाहिक वादाची खूप चर्चा झाली होती.