Bihar CM Oath Ceremony। बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएच्या प्रचंड विजयानंतर, आज पाटणामधील गांधी मैदानावर मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी समारंभाची तयारी सुरू आहे. नितीश कुमार शपथविधी सोहळ्यासाठी गांधी मैदानावर पोहोचले आहेत. तर थोड्याच वेळात पंतप्रधान मोदी याठिकाणी दाखल होणार आहेत. यासोबतच अमित शहा, अनेक केंद्रीय मंत्री तसेच एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. शपथविधी समारंभाची तयारी भव्य आहे. बिहार भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप जयस्वाल म्हणाले, “असा शपथविधी पहिल्यांदाच होत आहे आणि उत्सवाचे वातावरण आहे. यापूर्वी गांधी मैदानावर शपथविधी समारंभ आयोजित करण्यात आले होते, परंतु यावेळी ते उत्सवाच्या वातावरणात पार पडेल. बिहारमधील सुमारे २-३ लाख मतदार देखील उपस्थित राहतील.” नितीश कुमार १० व्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार Bihar CM Oath Ceremony। गांधी मैदानावर सकाळी ११:३० वाजता शपथविधी समारंभ सुरू होईल. नितीश कुमार आज (गुरुवार) १० व्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. यापूर्वी, बुधवारी (१८ नोव्हेंबर २०२५) बिहार विधानसभेच्या सेंट्रल हॉलमध्ये एक बैठक झाली होती, ज्यामध्ये नितीश कुमार यांची एनडीए विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाली. त्यानंतर नितीश कुमार यांनी राजभवनात जाऊन राजीनामा सादर केला आणि सरकार स्थापनेचा दावा केला. नितीश कुमार यांनी बुधवारी नितीश कुमार यांच्या राजीनाम्यापूर्वी अनेक बैठका घेतल्या. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जेडीयू विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. मुख्यमंत्री नितीश कुमार यांची एकमताने नेते म्हणून निवड झाली. भाजपचे सम्राट चौधरी नेते… विजय कुमार सिन्हा उपनेते Bihar CM Oath Ceremony। दुसरीकडे, बुधवारी भाजप प्रदेश कार्यालयात नवनिर्वाचित भाजप आमदारांची बैठक झाली. सम्राट चौधरी यांची एकमताने विधिमंडळ पक्ष नेते म्हणून निवड झाली, तर विजय कुमार सिन्हा यांची उपनेते म्हणून निवड झाली. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे देखील केंद्रीय निरीक्षक म्हणून भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या बैठकीत उपस्थित होते. सर्व नवनिर्वाचित आमदार उपस्थित होते.