बिहारमध्ये स्फोट : सात जणांचा मृत्यू झाल्याने उडाली खळबळ
Updated On:

वृत्तसंस्था – बिहारमधील भागलपूरमध्ये झालेल्या शक्तिशाली स्फोटात सात जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. ही घटना गुरुवारी रात्री घडली आहे. या भीषण स्फोटात तीन मजली इमारत जमीन जमीनदोस्त झाली तर जवळपासच्या इतर अनेक घरांचे नुकसान झाले आहे. ही घटना काजवलीचक परिसरातील अनाथाश्रमाजवळ घडली. या इमारती मध्ये बॉम्ब बनवण्यात येत असल्याचे शेजाऱ्यांचे म्हणणे आहे. याशिवाय पीडित मुलीचे कुटुंब फटाके बनविण्याचा व्यवसाय करत असल्याचेही सांगण्यात आले आहे.
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, गुरुवारी रात्री साडेअकराच्या दरम्यान तातारपूर पोलीस स्टेशन परिसरात हा स्फोट झाला असून यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला असून 12 जण जखमी झाले आहेत. भागलपूरचे जिल्हाधिकारी सुब्रत कुमार सेन यांनी सांगितले की, स्फोटामुळे दोन घरांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.





