Bihar Bhawan in Mumbai | राज्यातील महापालिकांसाठी मतदान झाले अन् निकालही जाहीर झाला. मात्र महापालिकेचे निकाल लागून आठवडाही पूर्ण होत नाही, तोच मुंबईत पुन्हा एकदा परप्रांतीय आणि मराठी मुद्याचा वाद वाढण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे मुंबईत होणारं ‘बिहार भवन’… मुंबईतील पोर्ट ट्रस्ट परिसरात बिहार भवन उभारलं जाणार आहे, बिहार सरकारनं याबाबत घोषणा करत प्रशासकीय खर्चाला मान्यता देखील दिली आहे. मुंबईमध्ये जे बिहार भवन उभारलं जाणार आहे, त्यासाठी बिहार सरकारने 314 कोटी रुपयांच्या प्रशासकीय खर्चाला मान्यता दिली आहे. हे प्रस्तावित बिहार भवन 30 मजली असणार आहे. या बिहार भवनात एकूण 178 खोल्या असणार आहेत. यासाठी सुमारे 0.68 एकर म्हणजेच 2752.77 चौरस मीटर क्षेत्रफळाची जमीन निश्चित करण्यात आली आहे. या बिहार भवनात सरकारी अधिकारी पाहुणे आणि गरजू लोकांसाठी सोय करण्यात येणार आहे. येथे शासकीय कामकाजासाठी कार्यालये, बैठकींसाठी 72 आसनांची सभागृहे, प्रशासकीय विभाग तसेच अत्याधुनिक पार्किंग व्यवस्था उपलब्ध असणार आहे. यात मुंबईत कामासाठी आलेल्या बिहारी नागरिकांसाठी राहण्याची सोय केली जाणार आहे. बिहार भवनाची एक महत्त्वाची वैशिष्ट्य म्हणजे कर्करोगासह इतर गंभीर आजारांच्या उपचारासाठी मुंबईत येणाऱ्या बिहारमधील गंभीर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांसाठी विशेष राहण्याची व्यवस्था असेल. मात्र हे बिहार भवन बांधण्यासाठी मनसेनं विरोध केला आहे. Bihar Bhawan in Mumbai | एकीकडे मुंबईत मराठी विरुद्ध अमराठी वाद सुरु असतानाच मुंबईत बिहार भवन उभारण्याचा मोठा प्लॅन आखण्यात येतोय. या निर्णयाला मनसेने जोरदार विरोध केला आहे. महाराष्ट्रात बिहार भवन बनवू देणार नाही, असा इशारा मनसेचे नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी दिलाय. Bihar Bhawan in Mumbai | भाजपचे मनसेला प्रत्युत्तर तर प्रत्येक राज्यात वेगवेगळं भवन असतं, काश्मिरमध्ये महाराष्ट्र भवन होत आहे, मग काश्मिरच्या लोकांनी महाराष्ट्र भवनाला विरोध करायचा का? की काश्मीरमध्ये आम्ही महाराष्ट्र भवन उभारू देणार नाही? उत्तर प्रदेशात आयोध्यमध्ये महाराष्ट्र भवन होत आहे, मग त्यांनी विरोध करायचा का? असं प्रत्युत्तर भाजपचे नगरसेवक नवनाथ बन यांनी मनसेला दिलं. बिहार सरकारच्या बांधकाम विभागाचे सचिव कुमार रवी यांच्या मते, ‘मुंबईत बिहार भवनाचा निर्माण राज्याच्या प्रगती आणि जनकल्याणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल आहे. यामुळे एकीकडे सरकारी कामे चांगली होतील, तर दुसरीकडे उपचारासाठी मुंबईत येणाऱ्या हजारो बिहारवासीयांना मोठी मदत मिळेल. हे भवन बिहार सरकारची सामाजिक जबाबदारी आणि आधुनिक विकास विचारसरणी दर्शवेल.’ मुंबईत अनेक राज्यांची अधिकृत भवनं मुंबईत आणि मुंबई महानगर परिसरात अनेक राज्यांची अधिकृत भवनं किंवा सदनं आहेत. आंध्र प्रदेश भवन, तेलंगणा भवन, राजस्थान भवन, गुजरात भवन, कर्नाटक भवन, केरळ भवन, दिल्ली सरकारचे गेस्ट हाऊस, उत्तर प्रदेश भवन यांचा समावेश आहे. तसेच महाराष्ट्रासह अनेक राज्यांची भवनं दिल्लीमध्ये आहेत. Bihar Bhawan in Mumbai | वाद निर्माण होण्याचे कारण काय? सध्या मुंबईत मोठ्या प्रमाणावर उत्तर भारतीयांचे स्थलांतर होत आहे. मागच्या काही दशकांमध्ये उत्तर भारतीय लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलीये. त्यात बिहार आणि उत्तर प्रदेश सारख्या राज्यांमधून येणाऱ्या लोकांचा टक्का मोठा आहे. अनेक जण बाहेरून नोकरीसाठी मुंबईत येऊन वास्तव करत आहेत. मात्र महाराष्ट्रात येऊन परप्रांतीय मराठी माणसावरच दादागिरी करताना दिसतोय. मोठ्या संख्येने परप्रांतीय महाराष्ट्रात येत असल्याने मराठी टक्का कमी होऊन हिंदी भाषिक प्रभाव वाढताना दिसते. समजा, आपण दुसऱ्या राज्यात गेलो तर, तिथल्या भाषेचा आणि संस्कृतीचा आदर करतो. अनेक वर्ष तेथे वास्तव्यास असल्यास तिथली भाषा शिकण्याचा प्रयत्न करतो. मात्र उत्तर भारतीयांमध्ये हे एकदम उलट आहे. मराठी भाषा न शिकण्याचा आणि मराठी माणसावरच वरचढ होण्याचे प्रकार येथे पाहायला मिळाले. याचे अनेक व्हिडिओ देखील समोर आले होते. दुसरीकडे, हिंदी भाषिक लोक मुंबईत येऊन आपलीच मराठी संस्कृती धोक्यात आणण्याचाही प्रयत्न करू शकतात. त्यामुळे मुंबईत होऊ घातलेल्या बिहार भवनामुळे याला आणखी खतपाणी मिळण्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच आता बिहार भवनाला राजकीय विरोधकांसह अनेकांकडून मोठ्या प्रमाणात विरोध केला जात आहे. Bihar Bhawan in Mumbai | हेही वाचा: मोठी बातमी! गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीचा सांगलीत मृत्यू