Bihar Assembly Election: बिहार विधानसभेसाठी काँग्रेसने जाहीर केली उमेदवारांची दुसरी यादी
Updated On:

Bihar Assembly Election: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने शनिवारी रात्री उशिरा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीत पाच उमेदवारांना तिकीट देण्यात आले आहे. यापूर्वी पक्षाने ४८ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली होती. त्यामुळे आतापर्यंत काँग्रेसने एकूण ५३ जागांसाठी आपल्या उमेदवारांची नावे घोषित केली आहेत.
यादीतील उमेदवार आणि मतदारसंघ:
काँग्रेसने जाहीर केलेल्या यादीनुसार, खालील उमेदवारांना तिकीट मिळाले आहे:
नरकटियागंज: शाश्वत केदार पांडे
किशनगंज: मोहम्मद कमरुल होदा
कस्बा: मोहम्मद इरफान आलम
पूर्णिया: जितेंद्र यादव
गया टाऊन: मोहन श्रीवास्तव
बिहार विधानसभेच्या एकूण २४३ जागांसाठी ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, तर निवडणुकीचा निकाल १४ नोव्हेंबर रोजी जाहीर होईल.





