“सम्राट चौधरींच्या नेतृत्वाखाली…” ; नायब सैनींच्या एका वाक्याने बिहारच्या राजकारणात खळबळ

Bihar Assembly Election । बिहारमध्ये यावर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील राजकीय हालचाली तीव्र झाल्या आहेत. एनडीएने आधीच सांगितले आहे की ते नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवेल. पण, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्या एका विधानाने बिहारचे राजकारण तापले आहे.
मुख्यमंत्री सैनी यांच्या विधानाने खळबळ Bihar Assembly Election ।
मुख्यमंत्री सैनी यांनी, “हरियाणानंतर आता बिहारची पाळी आहे. विजयाचा हा पताका थांबता कामा नये. बिहारमध्येही विजयाचा झेंडा फडकवला जाईल आणि आमचे सम्राट चौधरी यांच्या नेतृत्वाखाली विजयाचा झेंडा फडकवला जाणार असे महत्वाचे विधान केले आहे.
नायब सिंह सैनी यांचे हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे की एनडीए नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली आगामी बिहार विधानसभा निवडणुका लढवेल. हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचे विधान नितीश कुमार यांच्यासाठी तणाव निर्माण करणार आहे, कारण वेळोवेळी एनडीए नेत्यांनी असे म्हटले आहे की ते नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढतील. पण निवडणुकीनंतर ते मुख्यमंत्री होतील की नाही हे निश्चित नाही. तसेच मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याबाबत एनडीएकडून कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.
हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी काय म्हटले? Bihar Assembly Election ।
रविवारी, दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्राममध्ये, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय सैनी सेवा समाजाने ‘राष्ट्रीय जागृत महासंमेलन’ आयोजित केले होते. यावेळी हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, माजी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा खासदार उपेंद्र कुशवाह, बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
या दरम्यान, कार्यक्रमाला संबोधित करताना हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली बिहारमध्ये विजयाचा झेंडा फडकेल. आमचे सम्राट चौधरी यांच्या नेतृत्वाखाली विजयाचा झेंडा फडकणार आहे. जेव्हा मुख्यमंत्री नायब सिंह सैनी हे सांगत होते, तेव्हा सम्राट चौधरी तिथे उपस्थित होते.
अशा परिस्थितीत, हरियाणाचे मुख्यमंत्री सैनी यांनी सम्राट चौधरी यांच्याबाबत दिलेले विधान खूप महत्त्वाचे आहे, कारण या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. सर्व राजकीय पक्ष निवडणुकीसाठी आपापल्या रणनीती आखण्यात व्यस्त आहेत. सीएम सैनी यांच्या विधानानंतर बिहारमध्ये राजकीय खळबळ उडाली आहे.

