Bihar Assembly Election । बिहारमध्ये यंदा होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी निवडणूक रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर आज माउंटन मॅन म्हणून प्रसिद्ध असलेले दशरथ मांझी यांचे पुत्र भगीरथ मांझी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. याद्वारे काँग्रेस बिहारमधील महादलित जातींना, विशेषतः मांझी समुदायाला आकर्षित करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जाऊ शकतो. भागीरथ मांझी यांच्यासह अन्य दोन नेत्यांचाही समावेश Bihar Assembly Election । भागीरथ मांझी यांच्यासोबत माजी राज्यसभा खासदार अली अन्वर आणि कुंभार समुदायाचे नेते मनोज प्रजापती हे देखील आज काँग्रेसमध्ये सामील होतील. भागीरथ मांझी, अली अन्वर आणि मनोज प्रजापती, हे तिन्ही नेते महादलित, अल्पसंख्याक आणि मागास समुदायातील आहेत. या नेत्यांना पक्षात समाविष्ट करून, काँग्रेस वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या तयारीबाबत गंभीर असल्याचा संदेश देत आहे. आधी जेडीयूमध्ये अन् आता काँग्रेसमध्ये Bihar Assembly Election । २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी, भागीरथ मांझी जेडीयूमध्ये सामील झाले होते. आता ते काँग्रेसमध्ये सामील होणार आहेत. या वर्षी १८ जानेवारी रोजी लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी पटना येथे पोहोचले तेव्हा त्यांनी भागीरथ मांझी यांचा सन्मान केला. तेव्हापासून त्यांच्या काँग्रेसमध्ये प्रवेशाबाबत चर्चांना उधाण आले होते. जेडीयूमध्ये झालेल्या कथित दुर्लक्षामुळे ते पक्ष बदलत असल्याचे मानले जात आहे. भागीरथ मांझी हे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी यांच्या क्षेत्रातून येतात. दशरथ मांझी यांच्या कुटुंबातील सदस्यांना गया जिल्ह्यात मोठा प्रभाव असलेल्या जीतन राम मांझी यांच्या विरोधात पाहिले जाते. जीतन राम मांझी प्रमाणे भगीरथ मांझी देखील मुसहर जातीचे आहेत. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून काँग्रेस मतदारांमध्ये आपली पकड मजबूत करण्यात व्यस्त आहे. पुढील महिन्यात फेब्रुवारीमध्ये काँग्रेस जय बापू, जय भीम, जय संविधान परिषदेचे आयोजन करणार आहे जे चंपारणपासून सुरू होऊ शकते.