#BiggBossMarathi3 : कलाकारांपासून ते कीर्तनकारांपर्यंत कोण आहेत बिग बॉसच्या घरातील 15 स्पर्धक

मुंबई – जगभरात चर्चेत असणार, प्रत्येक पर्वामधून प्रेक्षकांना नवीन अनुभव देणारा, करोडो प्रेक्षकांचे अपार प्रेम मिळवलेला, संपूर्ण भारतामध्ये हुकुमत गाजवणारा कार्यक्रम म्हणजे “बिग बॉस”…

कलर्स मराठीवर बिग बॉस मराठीच्या दोन्ही पर्वांना अभूतपूर्व यश मिळाले आणि जेव्हा कार्यक्रमाचा नवा टिझर वाहिनीवर दिसला तेव्हापासून या कार्यक्रमबद्दलच्या बऱ्याच चर्चा पुन्हा एकदा प्रेक्षकांमध्ये सुरु झाल्या.

मग तो बिगचा आवाज असो, बिग बॉसच्या घरातील छोट्या मोठ्या गोष्टी वा किस्से वा बिग बॉस मराठीचे घर असो. आता हे घर पुढचे शंभर दिवस मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहे. त्यामुळे आज पासून पुन्हा एकदा मनोरंजन, भांडण, ड्रामा अन् बरंच काही तुम्हाला पाहायला मिळणार आहे.

बिग बॉस मराठीच्या सिझन तीमधील स्पर्धकांची नावे

अभिनेत्री सोनाली पाटील

अभिनेता विशाल निकम

गायक उत्कर्ष शिंदे

अभिनेत्री मीरा जगन्नाथ

अभिनेत्री स्नेहा वाघ

अभिनेता अविष्कार दारव्हेकर

सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई

सुरेखा कुडची

अभिनेत्री गायत्री दातार

किर्तनकार शिवलीला बाळासाहेब पाटील

अभिनेता विकास पाटील

अभिनेता जय दुधाणे

अभिनेत्री मीनल शाह

अभिनेता अक्षय वाघमारे

संतोष चौधरी

दरम्यान, बिग बॉस मराठीच्या सीझन तीनचे सूत्रसंचालन अभिनेते तसेच दिग्दर्शक महेश मांजरेकर करणार आहेत. 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.