मुंबई – 100 दिवस, 17 सदस्य आणि एक ट्रॉफी! बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आलेला प्रत्येक सदस्य जिंकण्याचे ध्येय घेऊन घरात येत असतो. नेहमीप्रमाणेच यंदाही ‘बिग बॉस मराठी’च्या तिसर्या पर्वाला देखिल संपूर्ण महाराष्ट्राने भरभरून प्रेम दिले.
घरातील प्रत्येक सदस्याने प्रेक्षकांची मने जिंकायला पहिल्या दिवसापासून सुरुवात केली होती. घरातील अँग्री यंग मॅन म्हणून ओळखला जाणारा ‘जय दुधाणे’ हा सुद्धा सुरुवातीपासून चांगलाच चर्चेत राहिला आहे.
जय दुधाणेचा घरात आणि टास्कवेळी आक्रमकपणा, त्याचा राग यामुळे बिग बॉसच्या दर शनिवार- रविवारी भरणाऱ्या चावडीवर कार्यक्रमाचे सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी जयची अनेकदा जाहीरपणे कानउघडणी केल्याचे आपण पहिले आहे.
View this post on Instagram
नुकतंच, बिग बॉस मराठीच्या तिसर्या पर्वाचा महाअंतिम सोहळा मुंबई येथे पार पाडला. यावेळी विशाल निकम याने बिग बॉसच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. तर जय दुधाणेने दुसरे स्थान पटकावले. बिग बॉस 3 महाविजेता ठरलेल्या विशाल निकमला 20 लाख इतकी धनराशी आणि ट्रॉफी मिळाली.
दरम्यान, या ग्रँड फिनालेमध्ये महेश मांजरेकर यांनी सगळ्यात मोठी घोषणा केली आहे. जय दुधाणे याला घेऊन सिनेमा करणार असल्याचे मांजरेकर यांनी जाहीर केल्यानंतर जय याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या सिनेमाचे नाव ‘शनिवारवाडा’ असे असेल असेही मांजरेकर यांनी यावेळी सांगितले. मात्र, ‘शनिवारवाडा’ या सिनेमात जयसोबत कोण कलाकार असतील हे अद्याप गुलदस्त्यात आहेत.