Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सदस्य वाद, भांडणं करण्यासोबत सदस्य काही नातीदेखील बनवतात. या घरात कधी प्रेमाचे वारे वाहतात तर कधी रक्षाबंधनाचा सणदेखील जल्लोषात साजरा केला जातो. या रक्षाबंधनाला ‘बिग बॉस मराठी’च्या घरात निक्कीने सूरजला राखी बांधली होती. आता अरबाजने घराचा निरोप घेतल्याने निक्की पूर्णपणे खालावली आहे. त्यामुळे सूरज निक्कीला दिलासा देताना आजच्या भागात दिसणार आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागात,”सूरज निक्कीला दिलासा देत म्हणतोय,”तुझा कोणी नाही…मी आहे ना”. त्यावर निक्की म्हणतेय,”तू आहेस ना. तुझ्यासोबत गप्पा मारायला बसेल मी”. सूरज त्यावर म्हणतोय,”आपलं कुटुंब आहे, घर आपलं आहे. आता रडायचं नाही…स्ट्राँग व्हायचं”. निक्की सूरजला उत्तर देत म्हणतेय,”स्ट्राँग तर आहेच…पण दु:खी झाले आहे”. सूरज पुढे म्हणतोय,”आपला माणूस आपल्याला सोडून गेल्यावर त्या भावना आपल्या डोळ्यातून बाहेर पडतात. आपण एकटा आलोय…आणि एकटंच आपल्या घरी जाणार. गेमवर फोकस आहे. खोटं बोलत नाही..मी लढणार…या खेळ एकट्याने खेळायचा आहे..स्वत:ला त्रास करुन घ्यायचा नाही”. घरातील कामांवरुन निक्की विरुद्ध घर बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागात पॅडी म्हणतोय,”ठरलंय ना ती तिचं तिचं काम करणार. जेवण पण ती तिचं तिचं बनवेल”. त्यावर निक्की म्हणते,”हे तुम्ही ठरवलं आहे… तिने नाही ठरवलं. तिचं मत वेगळं आहे.. तुमचं मत वेगळं आहे”. त्यावर डीपी दादा म्हणतात,”आपल्या घरात एक व्यक्ती असते जी कमवत नसते फक्त खात असते. त्याला रात्री कधी रडताना पाहिलं आहे का?”. ‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागात जान्हवी, अंकिता आणि सूरज एकमेकांसोबत चर्चा करताना दिसणार आहेत. जान्हवी सूरज आणि अंकिताला विचारतेय,”तुमची काल चर्चा झाली का जान्हवीसोबत जे असतात ते बाहेर जातात.. ती अनलकी आहे”. त्यावर पॅडी दादा म्हणतात,”अरबाज आम्हाला येऊन असं सांगत होता. वैभव तुझ्यासोबत होता तो बाहेर गेला, आर्या, संग्राम तुझ्यासोबत होते ते बाहेर गेले”.