Bigg Boss 19 | ‘बिग बॉस 19’ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. मात्र आता या शोच्या आगामी ‘वीकेंड का वार’ स्पेशल भागात अभिनेता सलमान खान होस्टिंग करताना दिसणार नाही. त्याच्या जागी बॉलिवूडमधील दोन सुपरस्टार या शोमध्ये एन्ट्री करणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 13 सप्टेंबर आणि 14 सप्टेंबरचा ‘वीकेंड का वार’ अक्षय कुमार आणि अरशद वारसी होस्ट करणार आहेत. विशेष म्हणजे 2006 मध्ये बिग बॉस’ हिंदी शोच्या पहिल्याच पर्वाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी अर्शदने निभावली होती. आता तो 19 व्या पर्वाच्या ‘वीकेंड का वार’ या स्पेशल भागात दिसणार आहे. यानिमित्त ‘जॉली LLB 3’ चित्रपटातील दोन्ही कलाकार ‘बिग बॉस 19’च्या स्टेजवर धुमाकूळ घालताना दिसू शकतात. सलमान खान चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त तर दुसरीकडे ‘बिग बॉस 19’मध्ये या आठवड्यात सलमान खान दिसणार नसल्यामुळे चाहते नाराज आहेत. सलमान खान त्याचा आगामी चित्रपट ‘बॅटल ऑफ गलवान’मुळे व्यस्त आहे. चित्रपटाचे शूटिंग लडाखमध्ये आहे. त्यामुळे सलमान ‘बिग बॉस 19’मध्ये दिसणार नाही. Bigg Boss 19 | दरम्यान, ‘जॉली एलएलबी 3’ हा चित्रपट 19 सप्टेंबर 2025ला रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुभाष कपूर यांनी केले असून यात अक्षय कुमार आणि अरशद वारसी वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे. Bigg Boss 19 | हेही वाचा: आपचे खासदार संजय सिंह यांना नजरकैद ; फारुख अब्दुल्ला यांना भेटण्यासाठी गेटवर चढले