Bigg Boss 19 : बिग बॉस 19 चा ग्रँड फिनाले 7 डिसेंबरला पार पडला आणि गौरव खन्ना यांनी या सीझनची ट्रॉफी जिंकली. परंतु त्यांच्या विजेतेपदावर आता वाद निर्माण झाला आहे. फर्स्ट रनर-अप फरहाना भट यांनी मोठं विधान करत गौरव खन्ना विजेतेपदाच्या लायकीचे नाहीत, असा आरोप केला आहे. “जिंकणं माझं ध्येय नव्हतं… मी मन जिंकले” फरहाना भट शोमध्ये त्यांच्या अॅग्रेसिव्ह स्वभावासाठी ओळखल्या जात होत्या. 18 स्पर्धकांमध्ये ती टॉप-2 मध्ये पोहोचून फर्स्ट रनर-अप ठरली. शोमधून बाहेर आल्यानंतर पॅपराझींनी गौरवच्या विजयाबद्दल विचारले असता फरहानाने काव्यात्मक शैलीत उत्तर दिलं, “ट्रॉफीवर माझी नजर कधी नव्हतीच. त्यांनी ट्रॉफी जिंकली, मी लोकांचे मन जिंकले.” तिने पुढे म्हटलं, “आम्हाला मिटवायला जगात दम नाही… आम्ही जिथे उभे तिथेच जमाना बनतो.” “गौरव विजेता बनण्याच्या लायकीचे नाहीत” – फरहानाचा आरोप चॅनेलला मुलाखतीत फरहानाने स्पष्टपणे म्हटलं की, गौरव खन्ना शोचे विजेते व्हावेत, अशी लायकी त्यांच्यात दिसली नाही. त्यांचा कॉन्ट्रिब्यूशन शोमध्ये खूपच कमी होता. ते कधीच स्पष्ट स्टँड घेत नाहीत आणि नेहमी सेफ खेळले. त्यांच्या वागण्यानं अनेकदा लोकांना कमी लेखलं, हे मी घरात अनेकदा उघडपणे बोललीही आहे. तिने थेट सांगितलं की तिला कधीच वाटलं नव्हतं की गौरव विजेते ठरतील ट्रॉफी जिंकली नसली तरी… कमाई भरपूर केली गौरव खन्ना यांनी ट्रॉफीसोबत 50 लाख रुपयांचे बक्षीस जिंकले. फरहाना फर्स्ट रनर-अप झाली असली तरी तिला कोणतीही बक्षीस रक्कम मिळाली नाही. तथापि डेक्कन क्रॉनिकल च्या अहवालानुसार, फरहानाने बिग बॉसमध्ये राहण्यादरम्यान दर आठवड्याला 1–3 लाख रुपये मानधन घेतले. तिची एकूण कमाई 45 लाख रुपयांपर्यंत झाली आहे. एकूणच, गौरव खन्नाच्या विजेतेपदावर फरहानाच्या वक्तव्यांनी नवा वाद पेटला आहे आणि सोशल मीडियावर याविषयी मोठी चर्चा सुरू आहे.