नीट- युजी पेपर लीक प्रकरणात मोठी अपडेट ! इंजिनियरला करण्यात आली अटक

नवी दिल्ली : सीबीआयने झारखंडमधील हजारीबाग येथील नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या ट्रंकमधून पेपर चोरल्याचा गुन्हा करणाऱ्याला नीट युजी पेपर लीक प्रकरणातील मुख्य आरोपीसह दोन जणांना अटक केली आहे, असे अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले. दोन अटकेंमुळे, वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील लीक, नक्कल करणे आणि इतर बेकायदेशिर प्रकरणांमध्ये अटक करण्यात आलेल्या एकूण व्यक्तींची संख्या आता १४ वर पोहोचली आहे, असे ते म्हणाले.
एजन्सीने पंकज कुमार उर्फ आदित्य, याला अटक केली आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जमशेदपूर मधील २०१७ -बॅचचा सिव्हिल इंजिनियर असलेला कुमार हा बोकारो येथील रहिवासी असुन त्याला पाटणा येथून अटक केल्यचे त्यांनी सांगितले. त्याने हजारीबागमधील NTA ट्रंकमधून नीट- युजी पेपर चोरल्याचा आरोप आहे.
सीबीआयने राजू सिंगलाही अटक केली आहे ज्याने कुमारला पेपर चोरण्यात आणि ते इतर टोळी सदस्यांना पाठवण्यात मदत केली होती, त्यांनी सांगितले की, सिंगला हजारीबाग येथून अटक करण्यात आली. वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील कथित अनियमिततेची चौकशी करणाऱ्या एजन्सीने सहा एफआयआर नोंदवले आहेत. बिहारमधील एफआयआर पेपर लीकशी संबंधित आहेत तर उर्वरित गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्रातील उमेदवारांची कॉपी आणि फसवणूकशी संबंधित आहेत.





