Munjya seque l : मुंज्याच्या सिक्वलबाबत मोठी अपडेट; शर्वरी वाघचा पत्ता कट होणार? ‘या’ अभिनेत्रीच्या एन्ट्रीची चर्चा

Munjya sequel : मराठमोळा दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांच्या मुंज्या या सिनेमाने बॅाक्स अॅाफिवर धूमाकूळ घातला होता. या सिनेमाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. ७ जून रोजी रिलीज झालेल्या या सिनेमाची बरीच चर्चा झाली होती. या सिनेमातील अभिनेत्री शर्वरी वाघ आणि अभय वर्गा यांची नवी जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती.
मुंज्याच्या घवघवीत यशानंतर या सिनेमाचा सीक्वल लवकरच येणार असल्याची चर्चा रंगू लागली होती. आता या सिनेमाविषयी एक मोठी अपडेट समोर आली आहे. मुंज्याच्या सिक्वलमधून अभिनेत्री शर्वरी वाघ हिचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे, याबाबत माध्यमांत माहिती समोर आली आहे. तर तिच्या जागी लापता लेडीज अभिनेत्रीची मुंज्या २ मध्ये एन्ट्री होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मात्र, याबाबत अद्यापर्यंत सिनेमाच्या टीमकडून अधिकृत सांगण्यात आलेलं नाही. जर शर्वरीचा सिनेमातून पत्ता कट झाला तर लापता लेडीज फेम अभिनेत्रीला याचा मोठा फायदा होऊ शकतो. मिडिया रिपोर्टनुसार, मुंज्या सिनेमाच्या सिक्वलमध्ये लापता लेडीज फेम अभिनेत्री प्रतिभा रांटाची एन्ट्री होऊ शकते.
मुंज्या २ च्या कथेवर काम सुरू असून, कथा आणखी रंजन बनविण्यासाठी नवी व्यक्तिरेखा जोडण्यात आली आहे. पहिल्या भागाचं कनेक्शन दुसऱ्या भागाची जोडण्यात आलं आहे. लवकरच मुंंज्या सिनेमाच्या सिक्वलच्या शुटिंगला सुरुवात होणार आहे. हा एक हॅारर कॅामेडी सिनेमा असणार आहे.
हेही वाचा : Zing Movie Teaser : तमाशा म्हणजे काय? झिंग सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला, व्हिडीओ पाहा…





