Sarpanch Santosh Deshmukh Murder Case : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठी अपडेट; विष्णू चाटेला अटक

बीड : बीडच्या केज तालुक्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणी आरोपी असलेल्या विष्णू चाटे याला आता पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ४ जणांना अटक केली आहे. तर ३ आरोपी अद्याप फरार आहेत. विष्णू चाटे हा हत्या आणि खंडणी मधील आरोपी आहे. विष्णू चाटे याच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे.
संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात आता पोलीस तपासाने वेग घेतला आहे. सीआयडीच्या पथकासह स्थानिक पोलीसदेखील या प्रकरणाचा तपास करत आहेत. आता त्याला न्यायालयासमोर हजर केले जाणार असून त्याच्या चौकशीत या हत्यामागचे कारणदेखील समोर येण्याची शक्यता आहे.
या प्रकरणात आरोपी कोण?
या हत्या प्रकरणात सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, महेश केदार, कृष्णा आंधळे आणि विष्णू चाटे या सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी विष्णू चाटे हे राष्ट्रवादीचा तात्कालिन तालुकाध्यक्ष आहेत.
काय आहे नेमके प्रकरण?
संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. संतोष देशमुख यांची गाडी अडवली. सहा ते सात जणांनी त्यांचं अपहरण केलं. त्यांना बेदम मारहाण करुन नंतर त्यांची हत्या करण्यात आली.





