LPG cylinder – एलपीजी (लिक्विड पेट्रोलियम गॅस) ग्राहकांसाठी आज, मंगळवारचा दिवस दिलासादायक ठरला. 1 एप्रिल रोजी होणाऱ्या इतर अनेक बदलांपैकी एलपीजीच्या किमतीतही एक बदल झाला आहे. तेल विपणन कंपन्यांनी एलपी सिलिंडरसाठी मंगळवारी नवीन दर जाहीर केले आहेत. नवीन दरानुसार, 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 41 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. तथापि, घरगुती गॅस सिलिंडर म्हणजेच 14 किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. 1 ऑगस्ट 2024पासून ते स्थिर आहे. इंडियन ऑइलने जाहीर केलेल्या नव्या दरानुसार, 1 एप्रिलपासून मुंबईत 19 किलोचा एलपीजी सिलेंडर आता 41 रुपयांनी स्वस्त झाला आहे आणि आता त्याची किंमत 1755.50 रुपयांवरून 1714.50 रुपयांवर आली आहे. दिल्लीत 1762 रुपये झाली आहे. यापूर्वी मार्चमध्ये तो 1803 रुपयांना मिळत होता.