Jitendra Awhad : काल १७ जुलै विधिमंडळाच्या लॅाबीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीची घटना घडली होती. या घटनेने आता वेगळं वळण घेतलं आहे. काल मध्यरात्री विधिमंडळाच्या गेटवर आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी थेट पोलिसांची गाडी अडवून ठिय्या घातला. यावेळी आव्हाड हे पोलिसांच्या गाडीखाली शिरल्याने पोलिसांना मोठी कसरत करत त्यांना बाहेर काढावे लागले. मारहाण करणाऱ्यांना सोडून पोलिसांनी मार खाणाऱ्या कार्यकर्त्याला अटक केल्याचा आरोप करत जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. विधान भवनाच्या गेटवर मध्यरात्री एक वाजता जितेंद्र आव्हाडांनी आंदोलन केल्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. विधिमंडळाच्या लॅाबीत गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात बाचाबाची झाली होती. आव्हाडांनी देशमुख या त्यांच्या कार्यकर्त्याला मारहाण झाल्याचे म्हणत टकले यांच्यावर मक्कोका अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी केली आहे. विधिमंडळाच्या गेवटर नेमकं काय घडलं? विधानभवनाच्या मागच्या गेटवरुन जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक नितीन देशमुख यांना पोलिस घेऊन जात असताना आव्हाड आणि कार्यकर्त्यांनी पोलिसांची कार अडवली आणि ठिय्या आंदोलन केले. सुमारे तासभर चाललेल्या या राड्यानंतर पोलिसांना बळाचा वापर करणे भाग पडले. यावेळी मोठी धरपकड झाली. आव्हाड थेट पोलिसांच्या गाडीखाली चालले होते. यावेळी पोलिसांना अशरक्षः त्यांना फरफटत बाहेर काढावे लागले. पडळकर यांच्या गुंडांनी माझा कार्यकर्ता नितीन देशमुख विधानभवनात याला मारहाण केली.यानंतर मारहाण करणारे विधानभवनातून पळून गेले.शिवाय पोलिसांनी माझ्याच मार खाणाऱ्या कार्यकर्त्याला पकडलं.आणि विधानसभा सचिवांनी माझ्याच कार्यकर्त्याला पोलिस स्टेशनला नेण्याचा घाट घातला आहे. म्हणजे मार… pic.twitter.com/U3Jfnuyzm9 — Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 17, 2025 आव्हाडांची पोस्ट आव्हाडांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून व्हिडीओ शेअर करत पोस्टही लिहिली आहे. पडळकर यांच्या गुंडांनी माझा कार्यकर्ता नितीन देशमुखला विधानभवनात याला मारहाण केली. यानंतर मारहाण करणारे विधानभवनातून पळून गेले. शिवाय पोलिसांनी माझ्याच मार खाणाऱ्या कार्यकर्त्याला पकडलंआणि विधानसभा सचिवांनी माझ्याच कार्यकर्त्याला पोलिस स्टेशनला नेण्याचा घाट घातला आहे, असा आरोप त्यांनी पोलिसांवर केला आहे. म्हणजे मार खाणार आमचा कार्यकर्ता, पळून जाणार पडळकर चे कार्यकर्ते आणि प्रशासन पकडून कारवाई कोणावर करत आहे तर आमच्याच कार्यकर्त्यांवर..! सत्ताधाऱ्यांना इतक शरण गेलेलं प्रशासन मी आजवर पाहिल नव्हतं..! या अधिकाऱ्यांकडे आत्मसन्मान नावाची काही गोष्टच नाही..! मी इतकच सांगतो, माझ्या कार्यकर्त्याला सोडल्याशिवाय मी उठणार नाही.! असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला होता. हेही वाचा : अमेरिकेचा पाकिस्तानला मोठा धक्का ; पहलगाम हल्ल्यासाठी जबाबदार असणाऱ्या ‘या’ संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून घोषि