शिरुर – शिरूर -पाबळ रस्त्यावरील(कोंढाणओढा) येथे काही महिन्यांपूर्वीच ओढ्यावरती पुलाचे बांधकाम झाले होते. तसेच काही महिन्यांपूर्वीच डांबरीकरणासह कार्पेटचे काम करण्यात आले होते. परंतु हे काम निकृष्ट झाल्यामुळे काही महिन्यातच संबंधित रस्ता काही ठिकाणी खचला आहे. व मोठे जीवघेणे खड्डेही पडलेले आहेत, शिवाय पुलाचा भरावही काही ठिकाणी ढासळलेला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाला वेळोवेळी कळवून देखील याबाबत योग्य दखल घेण्यात आली नाही, खड्डे बुजवण्यात आले नाहीत अथवा सदर कामांबाबत चौकशी झाली नाही . येत्या दोन दिवसात खड्डे न बुजवल्यास सामाजिक कार्यकर्ते निलेश यशवंत वाळुंज हे खड्ड्यांत झोपून, झाडे लावून आंदोलन आंदोलन करणार आहे. संबंधित रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडण्यास सुरुवात झाली असून ठिक ठिकाणी रस्त्यावर चिरा पडत आहेत, या कामाबाबतही लोकांच्या मनात प्रचंड निराशा आहे.जुलमी इंग्रज राजवटितून मुक्त होण्यासाठी प्रचंड मोठा संघर्ष मोठा त्याग बलिदान आपल्या स्वतंत्र सैनिकांनी व चळवळीतील नेत्यांनी केले आहेत, परंतु आजही आपल्याला न्यायासाठी व समाजहितासाठी आंदोलने करावे लागतात ?मग हे आधिकारी करतात तरी काय हा प्रश्न उपस्थित होत आहे. इंग्रज कालीन अनेक कामे,पुल आजही सुस्थितीत आहेत परंतू आपल्याकडे बहुतांश होणारी कामे लवकर खराब होतात याची कारणे सर्वांनाच ज्ञात आहेत त्यासाठी राज्यकर्त्यांनी आणि प्रशासकीय यंत्रणांनी आता गांभीर्यपूर्वक ह्या बाबींची दखल घेऊन गैरकारभार भ्रष्टाचार व निकृष्ट कामे करणार्यांस कठोर शासन करून सर्व कामे शासकीय नियमानुसार करून घेणे गरजेचे आहे याबाबत देखरेखीसाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करणे आवश्यक आहे, रस्ते, पुलांची कामे करण्यासाठी शासनाच्या नियमावली, शासन तरतुदींचे योग्य पालन होत नाहीत संबंधित निकृष्ट काम करणारे ठेकेदार व ज्यांच्या देखरेखी मध्ये कामे होतात त्या संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई होत नाहीत त्यामुळे निकृष्ट कामांना बळ येते यातूनच भ्रष्टाचार वाढतो राष्ट्रीय संपत्तीची मोठी हानीही यातूनच होत आहे, आणी हे अत्यंत गंभीर आहे. संबंधित रस्त्यांच्या निकृष्ट कामांबाबत दि.२४ ऑगस्ट २०२४ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंत्री महोदयांकडे,आणि संबंधित विभागाचे मुख्य अभियंता,अधीक्षक अभियंता,तसेच शिरूर उपविभागाकडे ईमेलद्वारे छायाचित्रांसह तक्रार करण्यात आलेली आहे, दोन दिवसांच्या आत मध्ये कोंढाणओढ्यावरील रस्त्याची दुरुस्ती व पुढील चौकशीसाठी कार्यवाही न झाल्यास तसेच संबंधित पुलाच्या ढासळलेल्या भरावाचे ठिकाणची दुरुस्ती न झाल्यास संबंधित ठिकाणी आंदोलन करून जीवघेण्या खड्ड्यांवरती नागरिकांच्या जीवाची रक्षण करण्यासाठी आम्ही स्वतः खड्ड्यामध्ये झोपणार आहोत आणि सदर खड्ड्यात वृक्षारोपण करणार आहोत,आमचा जीव गेला तरी आम्हाला परवा नाही, तसेच पुढील पंधरा दिवसांच्या आत आमदाबाद ते मलठण या झालेल्या निकृष्ट रस्त्याच्या कामाची चौकशी होणे आवश्यक आहे आणी काम नव्याने होणे आवश्यक आहे प्रशासनाकडून जनहितास्तव गांभीर्यपूर्वक दखल न घेतल्यास जनआंदोलन उभे करणार आहोत , निलेश यशवंत वाळुंज (सामाजिक कार्यकर्ते) अण्णापुर