प्रभात वृत्तसेवा पुणे – महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने २०२६ पासून सीईटी परीक्षेसाठी आधार आणि ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री (अपार) आयडी अनिवार्य केला आहे.एमएचटी-सीईटी परीक्षा २०२६ पासून वर्षातून दोनदा आयोजित केली जाईल. या बदलामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यासाठी अधिक संधी उपलब्ध होतील. शैक्षणिक वर्ष २०२६ साठीच्या सीईटी परीक्षांच्या ऑनलाइन अर्ज प्रक्रियेसाठी उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे महत्त्वाचे आहे. आधार कार्ड आणि अपार आयडी या दोन्ही गोष्टींची पडताळणी आणि अद्ययावत माहिती असणे अनिवार्य आहे.शैक्षणिक वर्ष २०२६ साठीच्या सीईटी परीक्षांच्या ऑनलाइन अर्ज प्रक्रिया लवकरच राज्य सीईटी सेलच्या अधिकृत वेबसाइटवर सुरू होणार आहे. या प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांना आवश्यक कागदपत्रांची माहिती देण्यात आली आहे. उमेदवारांकडे वैध आधार कार्ड असणे आवश्यक आहे. आधार कार्डवरील माहिती जसे की नाव, दहावीच्या प्रमाणपत्राप्रमाणे जन्मतारीख, नवीनतम छायाचित्र, पत्ता, वडिलांचे नाव आणि आधारशी जोडलेला मोबाईल नंबर सक्रिय आणि अद्ययावत असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. आधार व्यतिरिक्त, उमेदवारांनी त्यांचा अपार आयडी तयार करावा. तो नोंदणी प्रक्रियेसाठी आवश्यक असेल. अपार २०२६ साठी सीईटी अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी अनिवार्य असेल. दिव्यांग उमेदवारांसाठी, सक्षम प्राधिकरणाने जारी केलेले दिव्यांग प्रमाणपत्र किंवा युनिक दिव्यांग आयडी कार्ड अपलोड करणे अनिवार्य आहे. दिव्यांग उमेदवारांना युडीआयडी कार्ड मिळवावे लागणार आहे. आधार कार्डवरील नाव, जन्मतारीख, पत्ता आणि मोबाईल नंबर यांसारखी माहिती दहावीच्या प्रमाणपत्राशी जुळणारी असावी. मोबाइल नंबर आधारशी जोडलेला आणि सक्रिय असणे आवश्यक आहे, जेणेकरून संपर्कात कोणतीही अडचण येणार नाही. दिव्यांग उमेदवारांसाठी, त्यांच्या दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र किंवा युडीआयडी कार्ड आवश्यक आहे.