नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्य पंजाब दौऱ्यावरअसताना त्यांच्या गाड्यांच्या ताफा अडविण्यात आला होता. त्यामुळे देशा च्या अंतर्गत अति महत्वाच्या व्यतीची सुरक्षितता यावर अनेक प्रश्न उभे राहिले. मात्र पुन्हा एकदा मोदींच्या गाडीचा ताफा अडविला जाणायची शक्यता वर्तविली जात आहे.
अवघ्या काही दिवसांवर देशाचा प्रजासत्ताक दिन येऊन ठेपला आहे. . कारण, प्रजासत्ताक दिनी एका संघटनेकडून पंतप्रधान मोदींचा रस्ता अडवणार असल्याचा धमकीवजा इशारा देण्यात आला आहे.
पंजाबमध्ये पंतप्रधान मोदींचा रस्ता अडवल्याची जबाबदारी घेणाऱ्या शीख फॅार जस्टीस .या संघटनेनं आता सुप्रीम कोर्टातील वकीलांना धमकी दिल्याची माहिती समोर येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रजासत्ताक दिनी राजपथावर जाऊ देणार नाही, असा इशारा देत मोदींना इंडिया गेटवर पोहोचण्यापासून रोखणार असल्याचं या संघटनेकडून सांगण्यात आलं आहे.
पंतप्रधानांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं ही अतिशय धक्कादायक बाब होती. सदर घटनेची जबाबदारी शीख फॅार जस्टीसनंच घेतली होती.
आता म्हणे त्यांच्याकडून वकीलांनाही दिली धमकी देण्यात येत आहे. आम्ही काही वकीलांची यादी तयार करणार आहोत, असं म्हणत मोदी सरकारची बाजू घेऊ नका या शब्दांत त्यांनी इशारा दिला आहे.