मुंबई – बॉलिवूडमधून एक दुःखद बातमी समोर येत आहे. अभिनेता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं निधन झाल आहे. अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विट करत त्यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे. सतीश कौशिक हे कॉमेडी अभिनयासाठी प्रसिद्ध होते. अभिनयासह कौशिक यांनी दिग्दर्शन आणि चित्रपटांचा निर्माता म्हणून देखील बॉलिवूडमध्ये आपले योगदान दिले.
कौशिक यांच्या जाण्यानंतर बॉलिवूडमधून हळहळ व्यक्त होत आहे. अनेक दिग्गजानी कौशिक यांना सोशल मीडियावरून श्रद्धांजली अर्पण केली. कौशिक यांनी मिस्टर इंडियामध्ये केलेली कॅलेंडरची भूमिका प्रचंड गाजली होती. त्यासोबतच सलमान खानच्या तेरे नाम या सुपरहिट चित्रपटाचे कौशिक यांनी दिग्दर्शन केले होते.
जानता हूँ “मृत्यु ही इस दुनिया का अंतिम सच है!” पर ये बात मैं जीते जी कभी अपने जिगरी दोस्त #SatishKaushik के बारे में लिखूँगा, ये मैंने सपने में भी नहीं सोचा था।45 साल की दोस्ती पर ऐसे अचानक पूर्णविराम !! Life will NEVER be the same without you SATISH ! ओम् शांति! 💔💔💔 pic.twitter.com/WC5Yutwvqc
— Anupam Kher (@AnupamPKher) March 8, 2023
सतीश चंद्र कौशिक यांचा जन्म १३ एप्रिल १९५६ रोजी हरियाणामध्ये झाला.कौशिक यांनी आपल्या करिअरची सुरुवात 1983मध्ये आलेल्या जाने भी दो यारो या सिनेमातून केली होती. 1993 मध्ये त्यांनी रुप की रानी चोरों का राजा या सिनेमापासून आपल्या दिग्दर्शन कारकिर्दीला सुरुवात केली. अभिनयात देखील कौशी यांनी नशीब आजमावले. शंभरहून अधिक चित्रपटांमध्ये कौशिक यांनी महत्वाच्या भूमिका केल्या. मराठी,हिंदी,तामिळ अशा विविध भाषांमध्ये देखील सतीश कौशिक यांनीं काम केले.