मुंबई – दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा देव समजले जाणारे सुपरस्टार ‘रजनीकांत’ (super stat rajinikanth) यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना शुक्रवारी (दि. 25) हैद्राबातमधील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. रजनीकांत यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होत होता.
दरम्यान, अपोलो रुग्णालयानं नुकतंच एक मेडिकल बुलेटीन जारी केलं असून यामध्ये रजनीकांत यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार ‘थलैवा’च्या प्रकृतीत बरीच सुधारणा आहे. त्यांच्या चाचणी अहवालांमध्ये कोणतीही चिंतेची बाब नाही. तसेच, रजनीकांत यांना उच्च रक्तादाबाशिवाय इतर कोणताही त्रास नसल्याचे काल रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले होते.
अपोलो रुग्णालयातील डॉक्टरांची एक टीम रजनीकांत यांच्या प्रकृतीचा आढावा घेत आहे. ज्या आधारे दुपारनंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज सुद्धा दिला जाण्याची शक्यता आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत रजनीकांत यांच्या मोठा चाहता वर्ग असून, रजनीकांत लवकर बरे व्हावेत म्हणून चाहत्यांनी प्रार्थना करण्यास सुरुवात केली आहे. आपल्या आगामी अन्नाथे (Annaatthe) चित्रपटाच्या शूटिंगसाठी अभिनेत्री नयनतारा आणि रजनीकांत हे हैदराबादमध्ये होते. यावेळीच ही घटना घडली.