Gram Panchayat Election : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. मात्र, उर्वरित जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याने प्रलंबित आहेत. या सगळ्यात आता राज्यातील ग्रामपंचायती संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील कार्यकाळ संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका किमान सहा महिने लांबणीवर जाणार आहेत. यात यवतमाळ जिल्ह्यातील 980 ग्रामपंचायती असून राज्यातील 14237 ग्रामपंचायतीचा समावेश असून, त्यांचा कार्यकाळ येत्या वर्षात संपणार आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमणूक करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने जारी केले आहेत. त्यानुसार जानेवारी 2026 पासून डिसेंबर 2026 पर्यंतच्या काळात कार्यकाळ संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नेमणूक केली जाणार आहे. हेही वाचा : Ajit Pawar : भल्या पहाटे कामाचा धडाका लावणारा विकासपुरुष हरपला! कडूसमध्ये अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली याबाबतचे आदेश ग्रामविकास विभागाचे अपर सचिवांनी काढले आले असून, त्यानुसार जिल्हापरिषद मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत. 14 ऑगस्ट 2020च्या शासन आदेशानुसार प्रशासकाची नियुक्ती केली जाणार आहे. अमरावती विभाग- 2451 ग्रामपंचायती नागपूर विभाग- 1508 ग्रामपंचायत कोकण विभाग- 798 ग्रामपंचायत नाशिक विभाग- 2476 ग्रामपंचायत पुणे विभाग- 2870 ग्रामपंचायत छत्रपती संभाजीनगर विभाग- 4134 ग्रामपंचायत जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखेत बदल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखेमध्ये राज्य निवडणूक आयोगाने बदल केला आहे. त्यानुसार 5 फेब्रुवार रोजी होणारे मतदान आता 7 फेब्रुवारी रोजी होणार असून मतमोजणीची 9 फेब्रुवारी करण्यात येणार आहे. हेही वाचा : Ajit Pawar : शिरूरचा ‘विकासपुरुष’ हरपला! तळेगाव ढमढेरेमध्ये कडकडीत बंद; शाळा-कॉलेजला सुट्टी, बाजारपेठा ओस