Big Gst Scam : जीएसटीचा 1196 कोटी रुपयांचा घोटाळा उघड

नवी दिल्ली – जीएसटी इंटेलिजन्स महासंचालनालयाच्या पुणे क्षेत्र युनिटने 1,196 कोटी रुपयाचा जीएसटी घोटाळा उघडकीस आणला आहे आणि यासंदर्भात एका व्यक्तीला अटक केली आहे. यासंदर्भात पुणे, दिल्ली, नोएडा, मुजफ्फरनगर या ठिकाणी छापे टाकण्यात आले. बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट व्यवहार दाखविणार्या अनेक बोगस कंपन्या उघडकीस आल्या असल्याचे अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
आरोपीने खोट्या कंपन्या दाखवून इ – वे बिल तयार करून हा घोटाळा केला आहे. मात्र प्रत्यक्षात असे कसलेही व्यवहार झाले नसून याद्वारे 1,196 कोटी रुपयांच भ्रष्टाचार झाला आहे. अटक व्यक्ती मुजफ्फरनगर येथील एका खासगी कंपनीची संचालक आहे व या सर्व घोटाळ्यामागे तिचे कटकारस्थान असल्याचे दिसून येते. घोटाळा करणार्यांनी पत्ते, ओळखपत्रे, फोन क्रमांक इत्यादीचा डाटाबेस तयार केला आहे, त्या आधारावर भ्रष्टाचार करणार्यांनी भ्रष्टाचार केला असल्याचे दिसून येते.


