Google Pixel 10 : गूगलचा अत्याधुनिक फ्लॅगशिप स्मार्टफोन ‘Google Pixel 10’ ऑगस्ट महिन्यात लॉन्च झाला होता. लॉन्चिंगच्या वेळी किंमत जास्त असल्याने अनेकांनी हा फोन घेण्याचा विचार पुढे ढकलला होता. मात्र आता अॅमेझॉनवर हा फोन मोठ्या डिस्काउंटसह उपलब्ध झाल्याने खरेदीदारांसाठी ही उत्तम संधी आहे. चला तर जाणून घेऊया Pixel 10 चे प्रमुख फीचर्स आणि सध्या मिळणाऱ्या आकर्षक ऑफर्स. Google Pixel 10 : स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स : डिस्प्ले : Pixel 10 मध्ये 6.3-इंचाचा OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. यात 120Hz रिफ्रेश रेट आणि तब्बल 3000 निट्सची पीक ब्राइटनेस मिळते. स्क्रीनचे संरक्षण Corning Gorilla Glass Victus 2 करते. प्रोसेसर आणि सॉफ्टवेअर : या फोनमध्ये गूगलचा लेटेस्ट Tensor G5 चिपसेट देण्यात आला आहे. फोन Android 16 वर चालतो. खास म्हणजे, गूगल या डिव्हाईसला 7 वर्षे Android अपडेट्स देणार आहे. कॅमेरा सेटअप : मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सिस्टम देण्यात आला आहे. 48MP प्राथमिक सेन्सर 13MP अल्ट्रावाइड कॅमेरा 10.8MP टेलिफोटो लेन्स सेल्फीसाठी 10.5MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. बॅटरी : फोनमध्ये 4970mAh क्षमतेची बॅटरी दिलेली आहे, जी दैनंदिन वापर सहज हाताळते. लाँचिंगच्या वेळी Google Pixel 10 ची किंमत ₹79,999 होती. परंतु आता अॅमेझॉनवर 12GB + 256GB वेरिएंट फक्त ₹68,000 मध्ये उपलब्ध म्हणजे सुमारे ₹12,000 ची थेट सूट निवडक क्रेडिट कार्डवर ₹3,000 अतिरिक्त डिस्काउंट सूटीनंतर प्रभावी किंमत ₹65,000 यामुळे ग्राहकांना एकूण सुमारे ₹15,000 ची बचत होत आहे. फीचर्स, कॅमेरा क्वालिटी आणि सात वर्षांचे सॉफ्टवेअर अपडेट्स पाहता Google Pixel 10 आधीच एक शक्तिशाली फ्लॅगशिप स्मार्टफोन मानला जातो. आता अॅमेझॉनवर मिळणाऱ्या मोठ्या डिस्काउंटमुळे हा फोन खरेदी करण्यासाठी खरोखरच उत्तम संधी आहे.